Type Here to Get Search Results !

रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून खेचून डॉक्टर बनले देवदूत : आटपाडीतील डॉ.सप्तेश जाधव यांची किमया ; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून खेचून डॉक्टर बनले देवदूत
आटपाडीतील डॉ.सप्तेश जाधव यांची किमया ; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
 लक्ष्मणराव ऊर्फ एल.जी.खटके
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी : प्युट जेगर ( Peutz Jegher) सारख्या अतिदुर्मिळ आजाराने मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या रुग्णाला खेचून बाहेर काढण्याची किमया आटपाडी येथील डॉ.सप्तेश जाधव यांनी करून, हे डॉक्टर त्या रुग्णासाठी देवदूत बनले.
साठेनगर-आटपाडी येथील अमर नामदेव वाघमारे या 21 वर्षीय युवकाला पोटात दुखते म्हणून 20 डिसेंबर रोजी एम.एन.जाधव (सर) हॉस्पिटलचे डॉ. सप्तेश जाधव यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला  दिला होता. या रुग्णाने यापूर्वी इतरत्र तपासण्या करून दाखल केलेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या आतड्यात आतडी अडकली असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार, असे अन्य डॉक्टरांमार्फत सांगण्यात आले होते. आतड्यामध्ये गाठी असल्यामुळे त्याला प्रथम सिटीस्कॅन करण्याचा सल्ला, डॉ.जाधव यांनी दिला होता. मात्र रुग्णाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे व यापूर्वी त्यावर बराच खर्च झाल्यामुळे रुग्णालाही ते परवडणारे नव्हते. मात्र त्यासाठी सिटीस्कॅन करणे अत्यावश्यक होते. त्याचबरोबर हिमोग्लोबिन, लघवी तपासणी यासारख्या मूलभूत चाचण्या करणेही अनिवार्य होते. त्याची सायरम क्रिएबिलिटीही किमान ८ ऐवजी 1.5 पेक्षा कमी होती. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाणही 4 एककापेक्षा कमी होते. त्यामुळे या रुग्णाला प्रथम बाहेरून रक्तपुरवठा करण्याची गरज होती. या सर्व अडचणी असल्यामुळे हा रुग्ण आर्थिक परिस्थिती पाहता, अन्य हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन क्रिएटिन सामान्य करून सिटी स्कॅन करण्यात आले. या अहवालामध्ये आतड्यामध्ये मोठ्या व न मोजण्याइतक्या गाठी होत्या. या गाठीमुळे आतड्याला पीळ पडून, दोन फूट आतडे खराब झाले होते, त्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु प्रत्येक ठिकाणी या रुग्णाला हलाखीची परिस्थिती आडवी येत होती. त्यामुळे हा रुग्ण कासेगाव येथे आजोळी जाऊन पंढरपूर येथील दवाखान्यात तात्पुरता उपचार करू लागला. चार वर्षाचा असतानाच या रुग्णाची मिरज येथे अशीच शस्त्रक्रिया झाली होती. नंतर पंढरपूर येथून सांगलीतील भारती हॉस्पिटल, पुणे व मुंबई येथील केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार होईल या आशेने फिरला. पण या अशा रुग्णांचा उपचार होईल पण बरे वाटणार नाही. या प्रकारच्या दोन ते तीन रुग्णांची अशी अवस्था असताना, शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या शस्त्रक्रियेची खात्री देता येत नव्हती. त्यामुळे या रुग्णांच्या घरच्यांचेही मनोबल खचले होते. या सर्व प्रकारामध्ये 20 डिसेंबर ते 11 जानेवारी एवढा कालावधी गेला.
पुन्हा तो रुग्ण डॉ.सप्तेश जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर, परिस्थितीही तशीच जुनी होती व वजनही कमी झालेले होते. शरीरातील सहा मीटर आतड्यापैकी सहा ते सात फूट मोठे आतडे व सहा ते सात फूट लहान आतडे यामधील कोणताही भाग सामान्य राहिला नव्हता. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनी इच्छाशक्ती, धाडस व खर्च करण्याची तयारी दर्शवून शस्त्रक्रिया करण्याचा धोका पत्करला. यासाठी सुमारे सामान्यपणे चार ते साडेचार लाख रुपये इतका खर्च होता. व तो या रुग्णाला परवडणारा नव्हता. 11 जानेवारी रोजीपासून दाखल झाल्यानंतर चार रक्त बाटल्या देऊन सेंट्रल लिंक ऑपरेशनद्वारे न्यूट्रिशन इंजेक्शन चालू केले. 21 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करताना, पंढरपूर येथील भूलतज्ञ डॉ. अभिजीत पाटील यांच्या मदतीने व रुग्णाचे नातेवाईक डॉ.लांडगे यांच्या उपस्थितीत पाच ते सहा तास चालणारी शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर या रुग्णाला पाच दिवस उपाशी ठेवावे लागते, त्याप्रमाणे तसे केले. त्याच्या शरीरातील सहा ते सात फूट आतड्यापैकी अडीच फूट आतडे शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आले. त्यानंतर लिक चाचणी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी काही दिवसांचा कालावधी गेल्यानंतर, अपचन, जुलाब यासारख्या प्रकाराला बगल देत हा प्रयोग यशस्वी करण्यात आला. एफएफटी रक्त प्रोडक्ट सामान्य आल्यानंतर खाणे-पिणे सुरू केले.
या रुग्णाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, डॉ. जाधव यांनी त्यांच्या पत्नी डॉ. चैताली जाधव, समीर शेख, स्टाफमधील नर्स दबडे व श्रद्धा, डॉ. उत्कर्षा गवळी यांच्या बहुमोल सहकार्यातून अतिशय अल्प खर्चामध्ये ही शस्त्रक्रिया जबाबदारीने पार पाडली. एकूण 45 दिवसाच्या आसपास चार ते साडेचार लाख रुपये होणारा खर्च डॉक्टर जाधव यांनी अल्प प्रमाणात घेऊन एक लाख दोन ते तीन हजार रुपयांमध्ये ही सेवा पुरवली. तसेच या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणले. त्यामुळे ते डॉक्टर, रुग्ण अमर वाघमारे यासाठी देवदूतच बनले. त्यांना आर्थिक भरघोस सवलत देण्याबरोबरच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणाऱ्या सवलतीसाठी लागणारी पूर्तताही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
दोन ते पाच लाख लोकांमध्ये प्युट जेगर सिंड्रोम असलेला एक पेशंट आढळतो, एवढे या रोगाचे प्रमाण दुर्मिळ आहे. यामध्ये आतड्याला गाठी असतात. त्यामुळे पेशंटला त्रास होतो तसेच या रोगामध्ये आतड्यातील गाठीचे प्रमाण निश्चित नसते. त्यामुळे किती भागात गाठी आहेत व त्यांची संख्या किती आहे याबाबत अनभिज्ञता असते. या गाठी जरी कॅन्सरसारख्या नसल्या तरी, त्या धोकादायकच असतात. याबाबत प्युट जेगर यांनी संशोधन केले. हा आजार आनुवंशिक सुद्धा आहे.
डॉ.सप्तेश जाधव , एम.एन.जाधव(सर) हॉस्पिटल, आटपाडी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies