Type Here to Get Search Results !

मतदार संघाच्या विकासास कटिबध्द : सभापती पडळकर; खरसुंडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

पेवींग ब्लॉक शुभारंभ व दिव्यांगांना साहित्य वाटपप्रसंगी सभापती ब्रम्हानंद पडळकर, सरपंच लता पुजारी, उपसरंच दिलीप जानकर व अन्य.
मतदार संघाच्या विकासास कटिबध्द : सभापती पडळकर
खरसुंडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
खरसुंडी/मनोज कांबळे : खानापूर-आटपाडी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत देठे वस्ती येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ व भारत सरकारच्या सामाजिक अधिकारिता शिबिराअंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गावच्या सरपंच लताताई पुजारी, उपसरपंच दिलीप जानकर, शशिकांत देठे, पडळकरवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पडळकर, मार्केट कमिटीचे विष्णुपंत अर्जुन प्रमुख उपस्थित होते.
विकासकामात राजकारण करू नये, असे मत सभापती पडळकर यांनी मांडले. दलितवस्ती कामाचे प्रस्ताव द्यावेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यात येईल, शासकीय विश्रामगृह व गावातील जिल्हा परिषदच्या शासकीय जागेत कामांसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव द्यावेत, त्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. यापूर्वीही जिह्यातील गावांना दलितवस्ती सुधार योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात खरसुंडी जिल्हा परिषद गटात अधिक निधी उपलब्ध करून विकासकामांसाठी प्रयत्न करू, समाजकल्याण निधीतून मतदार संघात भरीव कामे करू असेही ते म्हणाले. यावेळी गावातील २० लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, कृत्रिम पाय, वृद्धांना आधारकाठी आदी देण्यात आले.
याप्रसंगी पं.स.सदस्या सारिका भिसे, ग्रा.पं.सदस्य विजयकुमार भांगे, जितेंद्र पाटील, मोहन शिंदे, सदस्या मीना छगन साळुंखे, सुवर्णा पुजारी, ग्रामसेवक शशिकांत शिंदे यांच्यासह विलास जानकर, सादिक शिकलगार, विकास पुजारी, अमर देठे, अजित भिसे, धनाजी देठे, अमोल माळी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अर्जुन पुजारी यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies