Type Here to Get Search Results !

अखेर राष्ट्रवादीला नारळ देत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपवासी मोंदीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजप प्रवेश: मा.खा. रणजितसिंह मोहिते-पाटील :

अखेर राष्ट्रवादीला नारळ देत माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपवासी
मोंदीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजप प्रवेश: मा.खा. रणजितसिंह मोहिते-पाटील 
माळशिरस/प्रतिनिधी: अखेर राष्ट्रवादीला नारळ देत रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपवासी झाले असून मोंदीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजप प्रवेश केला असल्याचे पक्षप्रवेशावेळी मा.खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मोहिते-पाटील समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.  माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते सुपुत्र असल्याने राष्ट्रवादी साठी मोठा झटका मानला जाहत आहे. मंगळवारी अकलूज येथे झालेल्या मोहिते-पाटील समर्थकांच्या बैठकीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. 
दरम्याकन, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राजकीय निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दुपारी ४ वाजता अकलूज येथील ‘शिवरत्न’ बंगल्यावर जिल्ह्यासह राज्यातील मोहिते-पाटील समर्थकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीकडे व मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते. 
आपल्या परिसरातील सहा जिल्हे व 31 तालुक्यांच्या भविष्याचा प्रश्नत असलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न. पूर्ण झाला पाहिजे तरच आपला परिसर समृद्ध होणार असून  उद्याची पिढी घडणार असून  हा प्रश्न  सोडविण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. व मोंदीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे मा. खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies