तिरवंडी येथे नुतन पोलीस उपनिरीक्षक व नोटरी पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, March 19, 2019

तिरवंडी येथे नुतन पोलीस उपनिरीक्षक व नोटरी पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार


तिरवंडी येथे नुतन पोलीस उपनिरीक्षक व नोटरी पदी निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार
माळशिरस/संजय हुलगे: तिरवंडी ता. माळशिरस जि.सोलापूर येथे नूतन पोलीस उपनिरीक्षक व भारत सरकार नोटरी पदी निवड झाल्याबद्दल तिरवंडी गावकऱ्यांच्या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला. 
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघमोडे तिरवंडी, सचिन तरडे कचरेवाडी, विष्णू वाघमोडे भांबुर्डी तसेच नुतन भारत सरकार नोटरी पदी तिरवंडीचे ॲड. राजाभाऊ वाघमोडे, ॲड.प्रशांत बिचुकले माळशिरस, ॲड.. शिवाजीराव मदने, विशाल पाटील यांचा  सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ॲड. राजाभाऊ वाघमोडे म्हणाले, तिरवंडी गाव हे नेहमीच चांगल्या गोष्टीचा पुढाकार असल्याने ते सारखे चर्चेत असते, त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना अधिकाऱ्याचे मार्गदर्शन महत्वाचे असते. शिक्षणाबरोबर सल्ला देखील महत्वाचा असतो. आमची निवड झाल्यापासुन अनेक ठिकाणी आम्हाला बोलावून सत्कार करण्यात आला. ह्याचा आदर्श इतर गावानेही घ्यावा असे  म्हणाले. 
सत्काराचे आयोजन ग्रामस्थांच्या तसेच शामराव बंडगर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी सरपंच मच्छिंद्र वाघमोडे, रामचंद्र बंडगर, नानासाहेब वाघमोडे, बाबासाहेब वाघमोडे, पप्पू बुद्धे, कुंडलिक वाघमोडे, शिवाजी वाघमोडे, सागर बंडगर, शिवाजी शिंदे, पोपट शिंदे, सुरेश तोडकर, शैलेश ताटे, संतोष सरगर, श्रीमंत माने, अशोक देशमुख, तानाजी वाघमोडे, समाधान माने, ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप वाघमोडे, मोहन वाघमोडे, नाना पाटील, अशोक सरताळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमंत माने तर आभार शामराव बंडगर यांनी मानले. 


No comments:

Post a Comment

Advertise