Type Here to Get Search Results !

नातेपुते परिसरात वाहन तपासणी मोहीम सुरु

नातेपुते परिसरात वाहन तपासणी मोहीम सुरु
 माणदेश एक्सप्रेस न्यूज
नातेपुते/प्रमोद शिंदे : सध्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून नातेपुते परिसरात पथकाकडून वाहन तपासणी मोहीम सध्या सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने व नातेपुते पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त व ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, कसून वाहन तपासणी सुरू आहे. २४ तास हा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोणत्याही प्रकारचा आचारसंहिता काळात अनुचित प्रकार घडू नये. 50 हजारपेक्षा जास्त रक्कम विनाकारण जवळ बाळगता येणार नाही. तसेच मादक पदार्थ व हत्यारे अशा प्रकारच्या वस्तुची कसून चौकशी करण्यात येत आहे. आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी पोलीस व निवडणूक आयोगाचे अधिकारी घेत आहेत. दहिगाव येथील बंदोबस्त पथकात निवडणूक आयोगचे अधिकारी आर.डी. माने,पोलीस कॉन्स्टेबल राजेश वसाव,धनाजी मुटकुळे,राकेश लोहार,गौरव थोरात व अन्य कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies