Type Here to Get Search Results !

सांगली लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान : 23 मे रोजी मतमोजणी


सांगली लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिलला मतदान
 23 मे रोजी मतमोजणी
सांगली, दि. 10 (जि. मा. का.) :  भारत निवडणूक आयोगाच्या वतीने सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे. 
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 44 सांगली लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अधिसूचना प्रसिध्दी 28 मार्च 2019, नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2019, नामनिर्देशन पत्राची छाननी 5 एप्रिल 2019, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2019, मतदानाची तारीख 23 एप्रिल 2019, मतमोजणीची तारीख 23 मे 2019 तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 27 मे 2019 अशी आहे.
44-सांगली लोकसभा मतदार संघात 281-मिरज, 282-सांगली, 285-पलूस-कडेगाव, 286- खानापूर, 287-तासगाव-कवठेमहांकाळ व 288-जत या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्ह्यातील 283-इस्लामपूर व 284-शिराळा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश 48- हातकणंगले या  लोकसभा मतदार संघात आहे. सांगली जिल्ह्यात 31 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादी नुसार एकूण 23 लाख 50 हजार 359 मतदारांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies