Type Here to Get Search Results !

शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी बसविला आटपाडीत छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा : विविध राजकीय नेत्यांनी केले अभिवादन

शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी बसविला आटपाडीत छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा
विविध राजकीय नेत्यांनी केले अभिवादन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: आटपाडी ग्रामपंचायत  कार्यालयासमोर ध्वजवंदन जागेत काल अचानक पहाटे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. शासकीय परवानगी न घेता हा पुतळा उभारण्यात आल्याने आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी हा पुतळा काढण्यासाठी  मुदत दिली; परंतु शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी पुतळ्याची  स्थापना  करण्याचा आग्रह धरला. नेतेमंडळी, पदाधिकारी, शिवप्रेमी यांच्याकडून पुतळा उभारण्यात आला, हलगीचा  व  फटाक्यांचे वारंवार आवाज करत  पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. आटपाडी शहरात  शिवप्रेमी शिवजयंती उत्सव मावळा समिती यांच्यावतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यासाठी आटपाडी शहरांमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. बाजार पटांगणातील चौकात शिवजयंती कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात येत आहे. कार्यकर्ते वाहनांना भगवे झेंडे लावून शहरात फिरत आहे. आटपाडी शहरात पोलीस ठाण्यातील चौकात आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा काही महिन्यापूर्वी शासकीय परवानगी न घेता उभारण्यात आला होता. आता दुसरा पुतळा शिवाजी महाराजांचा बाजार पटांगणातील चौकामध्ये उभारण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पुतळा  उभारण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. परंतु न्यायालयाच्या  आदेशाप्रमाणे शासनाच्या सर्व शासकीय परवानग्या घेऊनच पुतळा बसवणे गरजेचे असताना शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधून 14 फुटी चबुतरा  असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात  आला.
जम्मु काश्मीरमधील  हल्ल्यात राखीव सैनिक शहीद झाले. आत्मघाती  दहशतवादी  हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आटपाडी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. कार्यकर्त्यांनी शहरातून फेरी काढून भारत माता की  जय; शहीद जवान अमर रहे या घोषणा देत आटपाडी शहरातून फेरी काढली. बाजार पटांगणातील चौकात येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर  शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. शिवाजी  महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महराज यांच्या पुतळ्याला पंचायत समितीचे सभापती  हर्षवर्धन  देशमुख, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुहास बाबर,  विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील, जि.प. सदस्य अरुण  बालटे, स्वाभिमानी  आघाडीचे नेते भारततात्या पाटील मराठा समाजाचे जिल्ह्याचे  अध्यक्ष बापू गिड्डे, दत्तात्रय पाटील, अनिल पाटील, संतोष पाटील, मोहनराव देशमुख,   स्नेहजित पोतदार ॲड. धनंजय पाटील, दिग्विजय  देशमुख,  दिनकर पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते बाजार पटांगण चौकामध्ये  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies