मांडवे फेस्टीवल २०१९ चे माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते जल्लोषात उदघाटन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, February 17, 2019

मांडवे फेस्टीवल २०१९ चे माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते जल्लोषात उदघाटन

मांडवे: येथे मांडवे फेस्टिवलचे २९१९ चे उद्घाटन करताना मान्यवर 
मांडवे फेस्टीवल २०१९ चे जल्लोषात उदघाटन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
मांडवे/वार्ताहर: माढा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सव समारंभ निमित्त मांडवे ग्रामपंचायत व श्री. महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, मांडवे आयोजित "मांडवे फेस्टीवल २०१९" चे उदघाटन माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात शुक्रवार दिनांक १४|०२|२०१९ या दिवशी पुलवामा जम्मू काश्मीर या ठिकाणी CRPF च्या जवानांवर आत्मघाती हमला झाला यात CRPF चे ४२ जवान शहिद झाले. याबददल मांडवे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी भाषणात शेख म्हणाले मांडवे गावामध्ये विजयदादांच्या अमृतमहोत्सवा निमित्त मांडवे फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील चित्रकला, रांगोळी, वकृत्वस्पर्धा, निंबध स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. त्यापैकीच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि श्रीमती र. मो. विद्यालय मधील विद्यार्थ्याच्या विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाचे उदघाटक मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, अतिशय उत्कुष्ट असे नियोजन मांडवे ग्रामपंचायत आणि महालक्ष्मी चारिटेबल ट्रष्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच त्यांनी मांडवे गावात केलेल्या विकासकामांचे विशेष कौतुक केले. स्मार्ट ग्राम योजनेत भाग घेऊन गावाचा कायापालट झाल्याचे सांगत त्यांनी अशा प्रकारची विकासपयोगी कामे सर्व ग्रामपंचायतनी करावयास हवीत असे मत व्यक्त केले. तसेच विविध गुणदर्शन स्पर्धा घेतल्यांने विद्यार्थ्याचा सर्वागिण विकास होतो असे सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
फेस्टीवलमध्ये अंत्यत बहारदार व मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल पहावयास मिळाली. अबालवृध्दांना थक्क करणारी अंगणवाडीतील आणि प्राथमिक विभागातील मुलांची नुत्ये काळजाचा ठोका चुकवणारी व माध्यमिक विद्यार्थ्याची देशभक्तीपर गीत, निसर्गप्रेमी विद्यार्थ्याची नाट्ये व नृत्याविष्कारांनी मांडवेकरांचा फेस्टीवलचा दिवस अत्यंत जल्लोषपुर्ण वातावरणात साजरा झाला.
सदर कार्यक्रमास पं.स.सदस्य मानसिंग मोहिते, युवराज राजेभोसले, विस्तार अधिकारी खरात, लोणंदचे राजु पाटील, गिरवी सरपंच संतोष राऊत आदी मान्यवर व गामस्थ यावेळी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच कुमार पाटील, माजी सरपंच तानाजी पालवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अरविंद भोसले, राहुल दुधाळ, दिपक माने- देशमुख, दत्ताभाऊ ढोबळे, राजु गायकवाड, दत्ता गायकवाड, दादासाहेब देवगुंडे यांनी विशेष परिश्रम  घेतले. सुत्रसंचलन सरूडकर यांनी केले तर आभार पानसरे यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Advertise