Type Here to Get Search Results !

विरळी येथे आखिल भारतीय होलार समाजाची आढावा बैठक संपन्न

विरळी येथे आखिल भारतीय होलार समाजाची आढावा बैठक संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
वरकुटे-मलवडीप्रतिनिधी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा या शिकवणीप्रमाणे कार्य करून सामाजिक क्रांती घडवून आणली पाहिजे. माझा समाज स्वतःच्या पायावर सक्षम उभा करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मला जे काही करता येईल ते मी करणार आहे. आपल्यातले दारिद्रय, निरक्षरता, अज्ञान, शिक्षणाचा अभाव या सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळवून मगच सामाजिक चळवळीत उतरलं पाहिजे अशाप्रकारचे प्रतिपादन आखिल भारतीय होलार समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. पारसे यांनी केले.
विरळी (ता.माण) येथील लक्ष्मी मंदिरात आयोजित केलेल्या अखिल भारतीय होलार समाज संघटना (अ) गटाची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये होलार समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा करण्यात आली. होलार समाजबांधवांच्या अडीअडचणी, अल्पसंख्याक समाज असल्याने होणारे अन्याय, अत्याचार याकरिता एकत्रितपणे लढा देण्याचे एकजुटीने ठरविण्यात आले. यावेळी माण तालुकाध्यक्ष तानाजीराव अहिवळे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता केंगार, महाराष्ट्र सचिव आबासाहेब केंगार, सांगली जिल्हा शहराध्यक्ष भगवानदास केंगार,सरपंच प्रशांत गोरड,उपसरपंच हेमंत नलवडे,पोलीस पाटील रायचंद गोरड,शरद गोरड,दत्तात्रय रामचंद्र केंगार, विकास केंगार, प्रकाश गोरड,माण तालुका उपाध्यक्ष आबा नामदास,जिल्हा कार्याध्यक्ष वसंत तोरणे,सातारा जिल्हा युवा कार्याध्यक्ष सचिन केंगार,जिल्हा निरीक्षक पांडुरंग केंगार,साचिन हेगडे, गणेश हेगडे, पांडुरंग हेगडे, सागर जावीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चर्चा करण्यात आली. शासकीय योजनेत भुमीहिन बांधवाचे प्रश्न, खादी ग्रामोदयोग कर्ज प्रकरणे याविषयावर चर्चा करण्यात आली. होलार समाजाची आगामी  विधानसभा,लोकसभा निवडणुकीची भूमिका ठरवणे. अशा विविध विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी रामचंद्र केंगार, सदाशिवराव केंगार, अशोक केंगार, शहाजी गोरवे,पांडुरंग गोरवे, विठ्ठल केंगार, विजय केंगार आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies