Type Here to Get Search Results !

भरधाव ट्रक्स ओमिणीला धडकल्याने एकजण ठार; ओमनी चालक हकनाक ठार झाल्याने पिंपरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

अपघातग्रस्त ओमिणी गाडी 
भरधाव ट्रक्स ओमिणीला धडकल्याने एकजण ठार
माणदेश एक्सप्रेस न्युज
पिंपरी/बाळासाहेब कर्चे: पिंपरी ता. माळशिरस, जि. सोलापूर  येथे नातेपुते-शिंगणापूर रोडवर हरणटेक येथे आज दि. ३१ रोजी सकाळी ७.३० चे दरम्यान नातेपुतेकडून शिंगणापूरकडे
मृत चालक बबन शिंदे
 येणाऱ्या भरधाव महिंद्रा ट्रक्स एमएच-१८-अजे-७६२८ने पिंपरी येथून नातेपुतेकडे जाणाऱ्या ओमिणी एमएच-४५-एन-४४७५ ला समोरून जोरदार धडक दिल्याने ओमिणी चालक ठार झाला. तर ट्रक्समधील दोघे जण किरकोळ जखमी झाले.
अपघातग्रस्त ट्रक्स गाडी 

महिंद्रा ट्रक्स हि साक्री जि. धुळे येथील असून त्यामध्ये १२-१३ भाविक होते. ते शिखर-शिंगणापूर येथे देवदर्शनाला निघाले होते. तर ओमिणी ही पिंपरी येथीलच असून बबन राजेंद्र शिंदे हा नातेपुतेकडे ओमिणी घेऊन जात असता हरणटेक या ठिकाणी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक्सने विरोधी दिशेला जावून जोरदार धडक दिल्याने ओमिणीचा चक्काचूर होऊन चालक बबन शिंदे व.व. २० हा ठार झाला. तर ट्रक्स चालक हेमंत भास्करराव भगाने रा.साक्री जि.धुळे हा किरकोळ जखमी झाला.      
अवघ्या वीस वर्षाचा मनमिळावू युवक स्वत:च्या घरापासून अर्ध्या कि.मी. वर रस्त्याच्या स्वत:च्या साईटवर असताना समोरच्या चालकाच्या दुर्लक्षीतपणामुळे हकनाक ठार झाल्याने पिंपरी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नातेपुते पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वहाण व ड्रायव्हर यांना ताब्यात घेतले 

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्षीतपणा भोवला
गतवर्षी २८ जून २०१८ रोजी मध्यरात्री पिंपरी (हरणटेक) येथे याच ठिकाणी जळगाव ता.कोरेगाव येथील हनमंत यशवंत जाधव यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची वाँल्वो ट्रँव्हल एमएच-११-टी-९६६७ ही शाँर्ट-सर्किट होऊन अचानक पेट घेऊन पूर्ण जळून खाक झाली होती. ही घटना होवून सात महिने होऊन गेले. मात्र मालकानेही,पोलिसांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानेही  या गाडीचा सांगाडा अद्याप हालवला नाही. त्यामुळे या रस्त्यावर नविन वाहनचालकाचे या जळालेल्या गाडीकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असावा, असाही अंदाज बघ्यांमधून व्यक्त केला जात होता. 
या जळालेल्या गाडीकडे लक्ष वेधले जात वाहन चालकांचे लक्ष जात असून त्यामुळेच हा अपघात झाला असावा, असाही अंदाज बघ्यांमधून व्यक्त केला जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies