Type Here to Get Search Results !

“एकच निर्धार मोदी की हार” परिवर्तन झाले पाहिजे, हे सरकार गेले पाहिजे- धनंजय मुंडे : भोसे ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादीचा पक्षाचा परिवर्तन निर्धार मेळावा व भोसे ग्रामपंचायत कार्यालयाचा नुतनीकरणाचा शुभारंभ संपन्न

“एकच निर्धार मोदी की हार” परिवर्तन झाले पाहिजे, हे सरकार गेले पाहिजे- धनंजय मुंडे
माणदेश एक्सप्रेस न्युज
पेहे/विनोद धुमाळ:  युती सरकारने २०१४ च्या निवडणुकीत विविध प्रकारची आश्वासने देऊन सत्ता द्या, तुम्हाला अच्छे दिन देऊ. अशा प्रकारचे निव्वळ गाजर दाखवून दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता न करता जनतेची घोर निराशा केली असल्याची टीका राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांनी भाजप सरकारवर केली. भोसे ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील  यांनी राष्ट्रवादी पक्षाचा परिवर्तन निर्धार मेळावा व भोसे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी आयोजित केला होता याप्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी उपमुख्यमंत्री खास. विजयसिंह मोहिते पाटील, आ. बबनराव शिंदे, माजी आ. राजन पाटील, माजी खा. रणजितसिह मोहिते पाटील, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष अध्यक्ष दिपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष बळीरामकाका साठे, कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, अजिंक्यराणा पाटील, उमेश पाटील, मनोहर सपाटे, जयमाला गायकवाड, मंदाताई काळे, आप्पासाहेब कोरे, लतीफ तांबोळी, ॲड. गणेश पाटील आदी उपस्थित होते.
युती सरकार सत्तेवर येण्याअगोदर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन तत्त्वता सर्वनिकषात अडकवून ठेवले, तर प्रत्येक वर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे अमिष दाखवून महागाईच्या गप्पा मारणाऱ्यांनी २०१४  चा आणि २०१९ चा विचार करता महागाई कमी झाली का? वाढली? याचा जनतेने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मुंडे यांनी सांगत, युती सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो म्हणून मोदीने जनतेची दिशाभूल केली आहे व महागाईने जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला भाव नाही. भयानक दुष्काळ असतानाही अशा जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असे धनंजय मुंडे यांनी ठासून सांगितले.  जयंतराव पाटील म्हणाले की, देशातील न्याय व्यवस्थेत युती सरकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप होत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यायाधीशांनीच उघड केला असून ही बाब गंभीर असल्याचे सांगून देशावर कायमस्वरूपी ताबा ठेवण्याच्या हेतूने सर्व संस्था ताब्यात ठेवण्याचे पाप मोदी सरकार करीत असल्याचा आरोप पाटील यांनी बोलताना केला.
खासदार  विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना एका पाण्याच्या अवर्तनातच उजनी धरण २४ टक्क्यावर गेले आहे. यासाठीच कृष्णाभिमा स्थिरीकरणाचे काम होणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
राजूबापू पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यातील विविध समस्यांचा पाडा मांडला. यावेळी आ बबनराव शिंदे, माजी आम. राजन पाटील, दिपकआबा साळुंखपाटील यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे आभार ॲड. गणेश पाटील यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies