Type Here to Get Search Results !

नितीन बोटे यानां स्वराज्य संस्थेचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर : ९ फेब्रूवारीला सिने अभिनेत्री प्रांजल पालकर यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण

नितीन बोटे यानां स्वराज्य संस्थेचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
९ फेब्रूवारीला सिने अभिनेत्री प्रांजल पालकर यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
माणदेश एक्सप्रेस न्युज
कोल्हापुर/अनिल पाटील: शेणगाव ता. भूदरगड येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा भुदरगड तालूका आर्दश पत्रकार पुरस्कार न्यूज मराठी २४ चे विभागीय कार्यालय गारगोटी प्रमुख नितीन बोटे यांना जाहीर झाला असल्याची माहीती निमंत्रक युवराज येङूरे आणि सौ. निवेदिता येङूरे यांनी दिली. नितीन बोटे हे गेली 15 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करतात. या पुरस्कारामुळे त्यांचे भुदरगड तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
संस्थेकङून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, धार्मिक, महिला सबलीकरण, युवक संघटन, आमचा गाव आमचा विकास या विषयावर समाजाचे प्रबोधन केले जाते. समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना स्वराज्य पुरस्कार देवून गौरविले जाते. पुरस्काराचे वितरण शनिवारी ९ फेब्रूवारी रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय शेणगाव येथे सकाळी ११.०० वा. सिनेअभिनेत्री  इश्काची नौका फेम प्रांजल पालकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. राणी बाळासाहेब पाटील पुणे असून प्रमुख पाहूणे म्हणून करवीरचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरज, पीएसआय स्नेहा पाटील उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies