Type Here to Get Search Results !

सदाशिवराव शिंदे इंग्लिश मेडियम स्कुल उंबरगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न



सदाशिवराव शिंदे इंग्लिश मेडियम स्कुल उंबरगाव  शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/अक्षय बनसोडे: सदाशिवराव शिंदे इंग्लिश मेडियम स्कुल उंबरगाव (दिघंची) शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
या कार्यक्रमाचे उद्घाटक हर्षवर्धन देशमुख सभापती पंचायत समिती आटपाडी, प्रमुख अतिथी कु. निशाताई फुले अध्यक्षा झेप फाउंडेशन, प्रमुख आकर्षक कु.स्नेहल साळुंखे “वंटास” फिल्म अभिनेत्री, संस्थेचे अध्यक्ष श्रीरंगभाऊ शिंदे, संस्थचे सचिव प्रकाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य दिघंची, प्रणव गुरव, केशव मिसाळ, सौ. मनिषा पुसावळे पंकज रणदिवे युवानेते दिघंची, अशोकराजे देशमुख युवानेते, ब्रम्हदेव होनमाने युवा नेते पुजारवाडी, कृष्णदेव मोरे चेअरमन पुजारवाडी सोसा. सावंता पुसावळे ओ.बी.सी. संघटना जिल्हाध्यक्ष, बळवंतआण्णा मोरे माजी उपसभापती आटपाडी, शिवाजी कुचेकर सरपंच उंबरगाव, सुनिल गाढवे उपसरपंच उंबरगाव, अजित मोरे युवानेते दिघंची, विलास मोरे-पाटील उपसरपंच पुजारवाडी, शिवाजी पवार व्हा.चेअरमन पुजारवाडी इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे प्राचार्य दिलीप पिंजारी, यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.रणजित शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी अतुल ढोक, नितीन माळी तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी मोलाची साथ दिली.
या कार्यक्रमामध्ये  छोट्या मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य करुन पालक तसेच प्रेक्षाकांची मने जिंकली. पापा मेरे पापा, आई भवानी, नन्हा मुन्ना राही हो, मुझे माफ करना, छान किती दिसते यासारख्या गाण्यांनी हा कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies