Type Here to Get Search Results !

पुर्वजांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी पवार बांधवांचा मेळावा घेणार- सागर पवार

पुर्वजांच्या इतिहासाची माहिती होण्यासाठी पवार बांधवांचा मेळावा घेणार- सागर पवार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
कडेगाव/प्रतिनिधी: पुर्वजांच्या इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी राज्यातील पवार बांधवांचा मेळावा लवकरच घेण्यात येणार असुन पानिपतच्या लढाईत पवारांचे महाराजे श्रीमंत यशवंतराजे पवार यांच्या नेतृत्वात पवार सरदारानी लढाईत मोठी कामगिरी बजावली होती. त्यात काही पवार शुर पराक्रमी सरदाराना वीरगती आली तर सरदार महादेव राजे पवार हे जखमी झाले होते. एवढ्या मोठ्या लढाईत पवारांनी पराक्रम गाजवले हा इतिहास जनतेसमोर येणार असल्याचे श्रीमंत धार पवार सामाजिक प्रतिष्ठान पुण्याचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांनी सांगितले. तडसर ता. कडेगाव येथे आयोजित धार पवार यांच्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज व कालीका माता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
सागर पवार पुढे बोलताना म्हणाले कि, पवार घराण्यांनी पानिपतच्या लढाईत मोलाची कामगिरी होती. पवारांचे पुर्वज हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यात सरदार होते. तर 5 पिढ्यांनी स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अब्दालीचे आक्रमण परतुन लावण्यासाठी पवारांचे महाराजे श्रीमंत यशवंतराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली या लढाईत ते स्वतः व अनोजीराजे पवार, दत्तोजीराजे पवार, आप्पाजीराजे पवार, निंबाजीराजे पवार, नरसोजीराजे पवार, कर्नानीराजे पवार हे लढाईत कामी आले. तर सरदार महादेवराजे राजे पवार व बरचसे पूर्वज जखमी देखील झाले होते. यावेळी सरपंच हणमंतराव पवार, उपसरपंच सुरेखा पवार, माजी उपसभापती नथुराम पवार, ग्रा.प.सदस्य प्रविण पवार, भिमराव पवार, वसंतराव पवार, सुर्यकांत पवार, किरण पवार, संदिप पवार, संजय पवार, जयकर पवार आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभर कार्य पोहोचविणार 
पवार घराण्याच्या पुर्वजांच्या शौर्याची माहिती महाराष्ट्रभर असलेल्या पवार घराण्यातील बांधवांना व्हावा यासाठी पुणे येथे श्रीमंत धार पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान या नावाने संस्था स्थापन करण्यात आली असुन या संस्थेच्या माध्यमातून सपूर्ण महाराष्ट्रभरातील पवार बांधवाचे संघटन करून त्यांना प्रगती पथावर नेण्यासाठी व त्यांना आपल्या पुर्वजांचा इतिहास माहित व्हावा यासाठी प्रयंत्न करत असल्याचे सागर पवार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies