मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा आंदोलन-किरण साठे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 14, 2018

मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा आंदोलन-किरण साठे


मागील हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे  पैसे द्या अन्यथा आंदोलन-किरण साठे 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी :  मागील हंगामातील एफ.आर. पी.  प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम दिलेली नाही, अशा माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे किरण साठे दैनिक माणदेश एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. 
यावेळी ए म्हणाले, ज्या साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी मालक असतात मात्र त्यांना एफ.आर. पी.  ची रक्कम देणे  बंधनकारक असते. मात्र हे साखर सम्राट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून शेतकऱ्यांची अडवणूक करताना दिसत आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने सहभागी होऊन पाठिंबा देण्यात येत आहे. माळशिरस तालुक्यातील ज्या कारखान्याने एफ.आर. पी. ची रक्कम दिली नाही त्या कारखान्याला आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन छेडणार आहे व या आंदोलनामध्ये ऊस उत्पादक शेतकरी यांनी सहभागी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय ह्या आंदोलनाला धार निर्माण होणार नाही असेही ते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील साखर कारखाण्याच्या चेअरमन असणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर मागील हंगामातील रक्कम ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावरती जमा करावी अन्यथा साखर कारखान्यांचे चेअरमन यांच्या गाड्या अडवून त्याना जाब विचारण्यात येईल असा इशारा किरण साठे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise