रक्तदान शिबीर संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 14, 2018

रक्तदान शिबीर संपन्न


रक्तदान शिबीर संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज 
नातेपुते/प्रमोद शिंदे :  स्व. पार्वतीबाई जयवंतराव रूपनवर-पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिना निमित्त त्यांचे पुत्र बापु पाटील व महादेव पाटील यांनी रक्तदान शिबिर घेऊन समाजात एक वेगळा संदेश पोहचवण्याचा निर्णय घेतला व संपन्न केला. यावेळी 57 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तादन केले.
स्व. पार्वतीबाई जयवंतराव रूपनवर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी जीवनदान देण्याचा छोटा प्रयत्न म्हणून रूपनवर पाटील परीवार व रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कुरबावी ता. माळशिरस येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
ग्रामीण भागात रक्तदान बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अॅड. रामहरी रूपनवर, मा. खासदार रणजितसिंह मोहीते पाटील, राष्ट्रीय काँग्रेस सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष तानाजीराव थोरात, काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड सोमनाथ दामोदर वाघमोडे, डॉ. ए.पी. वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राकेश बक्षी, विराज पाटील, शुभम पोटे, राहुल गायकवाड व रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले. संकलन इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक बारामती यांनी केले. 
रक्तदात्यांनी या श्रेष्ठ दानामधे सहभागी होऊन ही दिवाळी कोणा गरजूला रुग्णाला जीवदान देऊन खऱ्या अर्थाने साजरी केली त्या बद्दल त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise