कामटे संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडविणार- शिंदे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

कामटे संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडविणार- शिंदे


कामटे संघटनेच्या माध्यमातून समस्या सोडविणार- शिंदे 
अशोक कामटे संघटनेचा 9 वा वर्धापन दिन साजरा
माणदेश एक्स्प्रेस न्युज 
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला येथील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेचा 9 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात प्रारंभी शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष संदीप बनकर यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहीद अशोक कामटे संघटनेच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त एका नवीन सामाजिक योजनेची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या सर्व कार्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी येथील कार्यक्रम, सूचना, समस्या, अभिप्राय सांगोलकरांनी संघटनेच्या अधिकृत माहिती 8308400505 या नंबरवर संदेश पाठवून मिळविता येईल. याचे उद्‌घाटन संस्थापक निलकंठ शिंदे-सरकार यांनी आजपर्यंत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबवून समाजातील अधिकाधिक समस्या या संघटनेच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या कार्याचे अहवाल वाचन अच्युतराव फुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष इंजि.चारुदत्त खडतरे, विठ्ठलपंत शिंदे, किरण माळी, आशिष जाधव, महेश केदार, तौसिफ शेख, चैतन्य राऊत, ओंकार सपाटे, यांनी परिश्रम घेतले. आभार ॲड. हर्षवर्धन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम  गीताने झाली.

No comments:

Post a Comment

Advertise