Type Here to Get Search Results !

दुष्काळी स्थिती ,नोटबंदी, कुरघोडीच्या राजकारणामुळे कारखान्याची बिले थकली- पद्मजादेवी मोहिते-पाटील


दुष्काळी स्थिती ,नोटबंदी, कुरघोडीच्या राजकारणामुळे कारखान्याची बिले थकली- पद्मजादेवी मोहिते-पाटील
हलग्याच्या गजरात लोकनेते प्रतापसिंह मोहीते - पाटील पॅनल चा प्रचाराचा शुभारंभ
माळशिरस/ संजय हुलगे: माळशिरस येथे शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा नारळ श्रीमती पद्मजादेवी मोहिते - पाटील व भानुदास सालगुडे - पाटील यांच्या शुभ हस्ते व सर्व गटाचे सदस्य यांच्या उपस्थितीत माळशिरस येथील हनुमान मंदीरात फोडण्यात आला व त्यानंतर प्रचाराची सभा सावता माळी मंगल कार्यलयात पार पडली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दुष्काळ व सरकारने केलेली नोटबंदी व कारखाना विरोधकांनी कारखान्याला कर्ज मिळू न देण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे सभासद शेतकऱ्यांची देणे शक्या झालं नाही. पण निवडणुकीनंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची पै ना पै दिल्याशिवाय कारखान्यात मोळी टाकणार नाही.
यावेळी बोलताना उमेदवार.भानुदास सालगुडे पाटील म्हणाले की, कारखान्याचे गतवैभव मिळवण्यासाठी प्रतापसिंह मोहीते-पाटील पॅनलला विजयी करा. तसेच प्रशासक नेमल्यामुळे एफआरपी देणे जमले नाही, तरी निवडणूक झाली कि सर्वाचे पैसे दिले जाणार याची खात्री देतो. जर विरोधकांना कारखाना हवा असेल तर त्यांनी स्वत:चे दोन कारखाने का बंद पाडले? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी बोलताना जीवन जानकर म्हणाले की, हाताची पाची बोटे एकत्रित आली की मुठ, एक व्रज मुठ कारखानाच काय आमदार खासदार की सुद्धा खेचून आणू एवढी ताकद असते. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने बांधलेली ही मुठ कायम ठेवली पाहिजे. एकत्रित नाही लढलो तर काय होऊ शकतं हे आपल्याला गेल्या आमदारकिला व पंचायत समिती निवडणुकीने दाखवून दिले आहे. डॉ मारूती पाटील. आप्पा कर्चे, बाळासाहेब सरगर, अशोक तडवळकर, शामराम बंडगर,अॅड कुलकर्णी, राजाभाऊ पाटील, प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली.
या प्रसंगी उपनराध्यक्ष मारूती पाटील, भानुदास सालगुडे पाटील, जीवन जानकर, भानुदास  पाटील, विशाल पाटील, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, बाळू लवटे,  आण्णासाहेब रूपनवर, अजय सकट, माऊली पाटील, बाळासाहेब सरगर, बाजीराव माने, मधुकर पाटील, पांडूरंग वाघमोडे,  विष्णू नारनवर, माणिक मिसाळ, शामराम बंडगर, तसेच कारखान्यांचे सभासद, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, विविध संघटनेचे पदाधिकारी, बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आप्पासाहेब रुपनवर यांनी केले. आभार माणिक मिसाळ यांनी मानले.

शेतकऱ्यांची सर्व बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जात नाहीत तोपर्यंत जरी आपला पॅनल निवडून आला तरीसुद्धा गुलाल उधळणार नाही. शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी बऱ्याच बँकांकडे गेले असता त्या ठिकाणी जाणीवपूर्वक कारखान्याला कर्ज मिळू दिले गेले नाही. त्यामुळे राजकारणाच्या हव्यासापोटी शेतकरी सभासदांना वेठीस करण्याचं काम शिवरत्नवाल्यांनी केले. सरड्यापेक्षाही रंग बदलणारी माणसे मला वडिलांच्या निधनानंतर पाहण्यास मिळाली. युवराज यांना पुढे करण्यासाठी पुतण्याचं खच्चीकरण केले जातय.
  डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies