"महावॉकेथॉन" रॅलीने सांगली-मिरजेत रस्ते सुरक्षा जागृती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

"महावॉकेथॉन" रॅलीने सांगली-मिरजेत रस्ते सुरक्षा जागृती


"महावॉकेथॉन" रॅलीने सांगली-मिरजेत रस्ते सुरक्षा जागृती
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 18: उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज सांगली व मिरज शहरातून काढण्यात आलेल्या "महावॉकेथॉन"  रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात आली. 
राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी 200 ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला. सांगली, मिरजेतही त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत 4 किलोमीटर्सचे अंतर चालून ही महावॉकेथॉन रॅली यशस्वी केली.
सांगलीत उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने  काढण्यात आलेल्या रॅलीस अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एम. एन. उचगावकर, पोद्दार स्कुलचे प्राचार्य जी. बी. पाटील आदि उपस्थित होते.
ही रॅली पोद्दार इंटरनॅशनल स्कुलपासून सुरु होऊन, हॉटेल आयकॉन, पुष्कराज चौकपर्यंत येऊन पुन्हा त्याच मार्गक्रमणाने पूर्ण करण्यात आली. यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, कर्मचारी, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ऑटो रिक्षा असोसिएशन, टॅक्सी असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मिरज येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयापासून रॅलीस प्रारंभ झाला. तेथून ही रॅली महानगरपालिका कार्यालय, गणेश तलाव ते पुन्हा त्याच मार्गक्रमणाने निघून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय येथे रॅलीची सांगता      झाली. या रॅलीत उपअभियंता एस. एस.मुल्ला, संजय देसाई, संजय पाटील, डी. पी. डोंगरे, सी. इ. गवळी, सांगली उप प्रादेशीक परिवहन कार्यालयाचे मोटार वहान निरीक्षक संदीप पाटील व शेखर पाटील, उपमोटार वाहन निरीक्षक श्रीमती गायकवाड, बांधकाम विभागाचे एस. एच. मुजावर यांच्यासह सर्व शाखा अभियंता, बांधकाम व उपप्रादेशिक विभागाच्या अखत्यारीतील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या रॅलीमध्ये वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे याबाबत माहितीचे फलक अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन रस्ते सुरक्षेबाबत घोषणाही दिल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही शहरात रॅली यशस्वी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Advertise