खरसुंडीत पावसामुळे बाजारकरांची तारांबळ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

खरसुंडीत पावसामुळे बाजारकरांची तारांबळ


खरसुंडीत पावसामुळे बाजारकरांची तारांबळ
आठवडा बाजारात रिमझीम सरी
खरसुंडी/मनोज कांबळे: खरसुंडी येथे दर रविवारी आठवडा बाजार असतो. काल आठवडा बाजारात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारकरांची तारांबळ उडाली. व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक, शेतकरी यांची पावसामुळे मोठी पळापळ झाली. पावसामुळे काही काळ बाजार बंद पडला.
खरसुंडी गटातील खरसुंडी येथे दर रविवारी मोठा बाजार भरतो. खरसुंडी शेजारील व आसपासच्या परिसरातील, वाड्या-वस्त्यावरील नागरिक आठवडा बाजारसाठी मोठ्या संख्येने खरसुंडी येथे येत असतात. साधारण: खरसुंडी यथील आठवडा बाजार हा सायंकाळच्या सुमारास फुल्ल भरतो. परंतु काल ५.३० वा. पावसाच्या हलक्या सारी आल्याने बाजारकरांची मोठी पंचाईत झाली.

No comments:

Post a Comment

Advertise