सुनील गाढवे यांची आदर्श जनसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड १२ नोव्हेंबर ला पुरस्कार प्रदान कार्यक्रम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

सुनील गाढवे यांची आदर्श जनसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड १२ नोव्हेंबर ला पुरस्कार प्रदान कार्यक्रम


सुनील गाढवे यांची आदर्श जनसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड 
१२ नोव्हेंबर ला पुरस्कार प्रदान कार्यक्रम
कडेगाव/प्रतिनिधी : कडेगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील गाढवे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा दि  प्राईड ऑफ महाराष्ट्र आदर्श जनसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम सोमवार दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता नवी मुंबई येथील वाशी मधील विष्णुदास भावे नाट्य मंदिर येथे होणार आहे.
सदर कार्यक्रम अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी, हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सुनील गाढवे गेली तीस वर्ष झाले सामाजिक, राजकीय, व्यावसायिक क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, धनलक्ष्मी वाचनालय, दूध संस्था, स्वयंरोजगार संस्थाची स्थापना करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम केले आहे. कडेगाव तालुका सराफ असोसिएशनचे अध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले आहे. तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना छोटेमोठे व्यवसाय  सुरू करणेस आर्थिक मदत कैली आहे. सुनील गाढवे यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांची आदर्श जनसेवा सन्मान पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise