शिवकृपा पतपेढी ला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्रधान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

शिवकृपा पतपेढी ला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्रधान


शिवकृपा पतपेढी ला महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्रधान
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/ संजय हुलगे : राज्याच्या सहकार क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे उत्कृष्ट काम करीत असलेली शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई या संस्थेला सन 2016 व 17 या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती माळशिरस विभागीय कार्यालयाचे वसुली अधिकारी चांगदेव अनभुले यांनी दिली. या सन्मानाचे स्मृतिचिन्ह रोख रक्कम व प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.
 हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी सहकार परिषदेचे अध्यक्ष मा. शेखर चरेगावकर, आमदार आशिष शेलार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त  सतीश सोनी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  कृष्णा शेलार, उपाध्यक्ष वसंत चव्हाण, संस्थापक संचालक चंद्रकांत वंजारी, माजी अध्यक्ष अविनाश भोसले इतर संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
 महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत गुणात्मकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर असलेली आणि गेली ३६ वर्ष राज्यातील सहकार क्षेत्रात दीपस्तंभासारखी आदर्शवत कामे करीत असलेली शिवकृपा पतपेढी चे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असून एकूण ८७  शाखा व ७ विभागीय कार्यालय आहेत.  ठाणे येथे सुसज्ज प्रशासकीय कार्यालय आहे. आतापर्यंत संस्थेच्या ठेवी १८६३ कोटी असून कर्ज वाटप १३९३  कोटी आहे. संस्थेचा संमिश्र व्यवसाय ३२५६ कोटी झाला आहे. संस्थेच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वचस्तरातुन कर्मचारी, संचालक व अध्यक्ष यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Advertise