शिंगणापुर रस्त्यावरील खड्डे शिल्लक मात्र बुजवण्याचे काम पूर्ण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 10, 2018

शिंगणापुर रस्त्यावरील खड्डे शिल्लक मात्र बुजवण्याचे काम पूर्ण.

शिंगणापुर रस्त्यावरील खड्डे शिल्लक मात्र बुजवण्याचे काम पूर्ण.
विचारणा केल्यास अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
 म्हसवड/अहमद मुल्ला: म्हसवड - शिंगणापुर रस्त्यावरील खड्डे मोठ्या प्रमाणत असून ही सदरचे खड्डे मात्र कागदोपत्री बुजवण्याचे काम पूर्ण झाले असुन या प्रकाराबद्दल वाहनचालकांमधुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आक्टोबर महिन्याचे शेवटी या रस्त्यावरील खड्डे कागदोपत्री भरण्यात आले आहेत. असेच म्हणावे लागेल. कारण या रस्त्यावरील म्हसवडकडील बाजुस अनेक मोठमोठे खड्डे भरले गेले नाहीत.
त्याच प्रमाणे शेंबडेवस्ती जवळील मोरी व महादेव मळ्याजवळील ओढ्यावरील मोरीवर साधारणपणे एक फुट खोलीचे खड्डे भरले नाहीत. याबाबत तेथे काम करणारे मजुर व जबाबदार अधिकारी यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
 कागदोपत्री काम पूर्ण झाले असले तरी हे काम अपुरेच आहे. पुढच्या महिन्यात म्हसवड येथील सिद्धनाथाची रिंगावण यात्रा आहे. त्यासाठी लाखो भाविक या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. त्यांना या न भरलेल्या खड्ड्यांचा त्रास होणार आहेच. शिवाय दररोज त्या रस्त्यावरून प्रवास करणारांना तर रोजचाच त्रास सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा जिल्हा कार्यालयातील जबाबदार अधिकारी वर्गाने या रस्त्याची पाहणी करुन संबंधीत ठेकेदारास उरलेले खड्डे भिजवण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी करणारे निवेदन लवकरच सातारा येथे पाठवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise