Type Here to Get Search Results !

संग्रामनगर, यशवंतनगर ग्रामपंचायत कडील पांणीपट्टीची थकबाकी वसूली न केल्यास पुन्हा आंदोलन---किरण साठे


संग्रामनगर, यशवंतनगर ग्रामपंचायत कडील पांणीपट्टीची थकबाकी वसूली न केल्यास पुन्हा आंदोलन---किरण साठे 
माळशिरस/वार्ताहर : यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायतकडील थकीत पांणीपट्टीची रक्कम अकलूज ग्रामपंचायत ने त्वरित वसूल करावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष व मनसे जिल्हाउपाध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर ठिय्या आंदोलन बहुजन ब्रिगेड संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश होनमाने व मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी आयोजित केले होते. या आंदोलनावेळी किरण साठे बोलताना म्हणाले, ५ डिसेंबर पर्यंत जर अकलूज ग्रामपंचायत ने यशवंतनगर व संग्रामनगर ग्रामपंचायत कडे असलेली रक्कम वसूल केली नाही तर ६डिसेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर आंदोलनाचे निवेदन पीएसआय  गोपाळ चावडीकर व ग्रामपंचायत चे डिकोळे यांनी स्वीकारले. या आंदोलनावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष व मनसे जिल्हाउपाध्यक्ष किरण साठे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे, शिवसेनेचे विरेंद्र वाघमारे, अनिल बंदपट्टे, एमआयएमचे मोहसीन शेख, भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष उमाजी मिसाळ, बळीराजा शेतकरी संघटनेचे अजित बोरकर, भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण संघाचे राजाभाऊ गायकवाड, बहुजन ब्रिगेड महिला आघाडीच्या वैशाली लोंढे, बहुजन ब्रिगेडचे आकाश होनमाने, मनसेचे बापू वाघमारे, धनाजी पाटील, अजित पवार, अक्षय बावकर, बाबा वाघमारे, सुदाम आवारे, महिला सेनेच्या रुक्मिणी रणदिवे, विकास बनसोडे, कुमार कांबळे, दलित पँथरचे अंकुश धाईजे, उदय कांबळे, सोमनाथ शेळके, महावीर पारसे, अजय साठे, विजय बनकर, दत्तात्रय कांबळे, दलित महासंघाचे आकाश लोखंडे, संतोष खंडागळे, कन्हैया ठोंबरे, महावीर पारसे, आकाश साठे, अमोल लोंढे उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन अनिल साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन उदय कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies