पाटील दांपत्याची यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

पाटील दांपत्याची यांची निवड


पाटील दांपत्याची यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर:

आटपाडी येथील ॲड.धनंजय पाटील यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्याच्या कायदेशीर सल्लागार पदी,तर आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांची सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील व राज्य संघटक कैलास जगन्नाथ गोरे यांनी पत्र दिले आहे.पंचायत राज विकास मंच,अखिल भारतीय सरपंच परिषद बळकटीकरणासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे. ॲड.धनंजय पाटील हे वकिल व्यावसायिक आहेत.तसेच शासनाने नोटरी म्हणूनही त्यांची नियुक्ती केली आहे.आटपाडी येथील वरदान उद्योग समूहाचे ते संचालक आहेत.तर सरपंच सौ.वृषाली पाटील या त्यांच्या पत्नी असून आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच आहेत. 

No comments:

Post a Comment

Advertise