पुजारवाडी (आ) येथे आरोग्य शिबिर संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

पुजारवाडी (आ) येथे आरोग्य शिबिर संपन्न


पुजारवाडी (आ) येथे आरोग्य शिबिर संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/वार्ताहर: पुजारवाडी (आ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून आरोग्य शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मंगल दगडू मोठटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी चेअरमन अरविंद चव्हाण उपस्थित होते. आटपाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम, डॉ. अमोल गायकवाड यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. आरोग्य सहाय्यक खाडे, अरुण फुले, आरोग्य सेवक गणेश राक्षे, आरोग्य सेविका पवार व मुल्ला, गटप्रवर्तक मंजुश्री पाटील यांनी आरोग्य शिबिरामध्ये सेवा सुविधा पुरवल्या. या आरोग्य शिबिरामध्ये 294 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 175 रुग्णांची मधुमेहाची तपासणी करण्यात आली. यासर्व रुग्णांना पाच दिवसांसाठी लागणारी औषधे मोफत देण्यात आली.
माणदेश मेडिकलचे  विकास पाटील, प्रताप जाधव, अनिल बारशे यांनी या शिबिरामध्ये आवश्यक पुरवण्याचे काम केले. मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष सुशीलकुमार मोटे, ग्रामपंचायतीच्या उपसरपंच यशश्री बालटे,  ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार कदम,  वैशाली पाटील, जगन्नाथ काटे, सचिन मोटे, सागर मोटे,  कुरणे सर,  देशमुख मॅडम, भारत चव्हाण, ग्रामसेवक आर.एम. कोळी, ग्रामपंचायत कर्मचारी शीतलकुमार हातेकर, प्रफुल्ल ऐवळे, आशा स्वयंसेविका जयश्री विष्णू पुजारी व लतिका विठ्ठल पुजारी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत कदम म्हणाले की, पुजारवाडी आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांनी 14 व्या वित्त आयोगातून हे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे त्याचा लाभ सर्वांना निश्चितच होत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise