अन् त्या कुंटुबाच्या चेहऱ्यावर हसु फुलले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

अन् त्या कुंटुबाच्या चेहऱ्यावर हसु फुलले


अन् त्या कुंटुबाच्या चेहऱ्यावर हसु फुलले
पंचायत समीतीत ७ ट्रॉक्टरचे व  घरकुल जागेसाठी चेकचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे: घरकुल मिळाले मात्र जागा नाही, याजागे अभावी बाधकाम करता येत नाही. त्यामुळे अनेक लाभार्था नाराज होते. मात्र पंडीत दीनदयाळ उपाध्यय योजनेतुन लाभार्थना घरकुल बांधकाम करणेसाठी जागा खरेदीसाठी प्रत्येकी ५० हजार रक्कमेचे चेक लाभार्थीना  खास. विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते  देण्यात आले अन् त्यावेळी या कुंटुबाच्या चेहऱ्यावर हास्य दिसु लागले.
नुकतेच पंचायत समितीच्या माध्यमातुन  समाजकल्याण (राज्य) विभागाच्या वतीने मागासवर्गीय बचत गटाचे लाभार्थीना ७  ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तर ५ प्रस्थात सादर केले आहेत.
 यावेळी विजयसिंह मोहीते पाटील यांचा सत्कार उपसभापती किशोर सुळ यांनी केला. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, आप्पासाहेब देशमुख, अॅड. मिलींद कुलकर्णी, गणपतराव वाघमोडे, रावसाहेब पराडे, भिमराव काळे, तहसिलदार आभिजीत पाटील, सचिन पाटील, सरपंच राहुल जाधव, अरविंद भोसले, महादेव तरंगे, कुमार पाटील, रावसाहेब वाघमोडे यांचा सन्मान करण्यात आला. सभापती वैष्णवीदेवी मोहीते पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी शौर्य बचत गट, तथागत पुरुष बचत गट, फुले शाहु आंबेडकर बचत गट, पंचशिल समता बचत गट. नमोबुद्ध बचत गट, दत्तकला बचत गट या गटांना ट्रक्टर देण्यात आले. तर जागा खरेदीसाठी अनिता जगताप, शाहीन शेख तांबवे, ज्ञानदेव बनसोडे तांबवे, झाकीर शेख तांबवे या लाभार्थांना प्रत्येकी ५० हजार रुपये चेक देण्यात आला.


विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सध्या शासनाच्या अनेक योजना सुरू असुन या योजनासाठी तालुक्यात मंडलनुसार कॅम्पचे आयोजन करून लोकांपर्यंत पोहचविणार असल्याचे तहसिलदार अभिजीत पाटील यांनी सांगितले तर यावेळी गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, सहाय्यक अभियंता अमोल मस्कर यांनी यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. राष्टवादी सेलचे अध्यक्ष अरविंद भोसले यांनी वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले, चर्मकार, अपंग विकास, आणासाहेब पाटील विकास महामंडळासह मागासवर्गीय योजनांसाठी अनेक योजना सांगितल्या त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना घेता येत असल्याचे सांगितले. 
यावेळी मा.खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सुळ, तहसिलदार अभिजीत पाटील, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती  मामासाहेब पांढरे, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, रावसाहेब पराडे पाटील, गणपतराव  वाघमोडे, प्रतापराव पाटील, भीमराव काळे,  राहुल वाघमोडे, संदिप घाडगे,  धर्मराज माने, तानाजी पालवे, अॅड. मिलिंद कुलकर्णी, लक्ष्मण पवार, अरविंद भोसले, फातिमा पाटावाला, माजी सरपंच सुनिता ठोंबरे, राहुल जाधव, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महादेव तरंगे, कुमार पाटील,  पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब वाघमोडे. जि.प. सदस्य मंगल वाघमोडे, ऋतुजा मोरे, सुनंदा फुले, बाळासाहेब धांईजे, प्रताप पाटील, नानासाहेब नाईकनवरे, मानसिंग मोहीते, हसिना शेख, हेमलता चांडोले, रेणुका माने देशमुख, राहुल वाघमोडे, दत्तात्रय रणनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise