समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजकार्य-तुषार ठोंबरे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 13, 2018

समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजकार्य-तुषार ठोंबरे


समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजकार्य-तुषार ठोंबरे
माणदेश एक्सप्रेस न्युज  
विटा/प्रतिनिधी : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे भान ठेवून समाजात आपले नाव उज्वल करण्यासाठी आवर्जून समाज कार्य करून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करणारे तुषार ठोंबरे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुषार ठोंबरे हे आपले वेगवेगळे उपक्रम राबवून समाज कार्य करीत असतात. अनेक कार्यकर्ते त्यांच्या मदतीने कुठलेही स्वरूपाची मदत करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. सदैव समाजकार्यत मग्न असणारे आणि त्यांचे कार्यकर्ते समाजाकडून कुठलेही मदतीची अपेक्षा करत नाही. उलट समाजसेवा करण्यासाठी सदैव तत्पर असतात.त्यामुळे प्रसंगी त्यांना त्यांच्या घरच्या कडून ही काही वेळेस विरोध सहन करावा लागतो.  मात्र ते आपले समाजकार्याची व्रत सोडत नाहीत अशा या समाजकार्य करणाऱ्या युवकाचा गौरव कुंडल येथील आधार ग्रामीण संस्थेच्यावतीने जेष्ठ समिक्षक साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांक हस्ते पुरस्कार देवून करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

Advertise