वैभव देशमुख यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

वैभव देशमुख यांची निवड


वैभव देशमुख यांची निवड 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा/प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) गटाच्या विटा-खानापूर तालुका युवक आघाडी तालुकाध्यक्ष पदी वैभव महेंद्र देशमुख यांची निवड करण्यात आली. सदरची  निवड अशोक काबळे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष याचे आदेशानुसार, तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे विटा यानी जाहीर करून त्यांना तसे निवडीचे पत्र दिले. यावेळी युवक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कांबळे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नाम. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या सुचनेनुसार व युवक जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या आदेशानुसार सदरच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नूतन युवक आघाडीचे अध्यक्ष देशमुख म्हणाले, आरपीआय पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचे काम करणार असून तालुक्यात युवक आघाडीच्या गाव तेथे शाखा हा उपक्रम राबविणार आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise