खरसुंडीत गरिबांच्या घरी साखरेचे वाटप अग्रणी सोशल फौंडेशन विटा, खरसुंडी शाखेचा उपक्रम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 7, 2018

खरसुंडीत गरिबांच्या घरी साखरेचे वाटप अग्रणी सोशल फौंडेशन विटा, खरसुंडी शाखेचा उपक्रम

 
खरसुंडीत गरिबांच्या घरी साखरेचे वाटप 
अग्रणी सोशल फौंडेशन विटा, खरसुंडी शाखेचा उपक्रम 
 खरसुंडी/वार्ताहर : खरसुंडी येथे भटके-विमुक्त समुदायातील नंदीवाले वस्तीमध्ये अग्रणी सोशल फौंडेशन विटा, शाखा-खरसुंडी यांचे वतीने संस्थेचे उपाध्यक्ष मनोज कांबळे व इकोनेट फेलो रिटा माने यांचे हस्ते दिवाळीनिमित्त साखरेचे वाटप करण्यात आले. प्रकाशाचा दिवाळी सण मोठ्या हर्षोलत्सात सर्वत्र साजरा होत असतानाही भटक्यांच्या पालात मात्र अजूनही अंधकार आहे. या दुष्काळी वातावरणात, सदर समूदायास गोडधोड अन्नाचे दोन घास मिळावेत या मानवतावादी हेतू अग्रणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी साखरवाटपाचा उपक्रम पार पाडला. यासाठी परिसरातून व भटक्या समाजातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी  रविराज भिसे, नवनाथ वाघमारे, अनिल मगदूम,  आण्णा पवार, संतोष पवार, जयश्री आराध्ये, काळुबाई देशमुख, संगीता चव्हाण, सिंधुबाई पवार, लक्ष्मण देशमुख, मारुती पवार, तुकाराम चव्हाण, लक्ष्मण पवार, रामभाऊ पवार, अग्रणी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह खरसुंडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise