ज्ञानेश्वर सस्ते यांचा विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

ज्ञानेश्वर सस्ते यांचा विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


ज्ञानेश्वर सस्ते यांचा विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार 
माणदेश एक्सप्रेस न्युज
श्रीपुर/वार्ताहर: माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील ज्ञानेश्वर रामलिंग सस्ते याची टेराडेटा कंपनीच्या वतीने कॅनडा येथील टोरँटो येथे 'सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व सरपंच बालाजी गव्हाणे यांच्या हस्ते दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालाजी गव्हाणे होते.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ कदम यांनी केले.  याप्रसंगी बोलताना वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड म्हणाले की, जिद्द व चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आत्मविश्वासाने उज्ज्वल यश संपादित करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने भरपूर अभ्यास व सराव करावा. आपल्या आईवडिलांच्या इच्छा व स्वप्ने साक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नपूर्वक ध्येय गाठावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. 
सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर सस्ते म्हणाले की, आज माझ्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले असून ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारामुळे मला मनस्वी आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी सोसायटीचे उपाध्यक्ष बाळू गुंड, पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, बबन उबाळे, दत्तात्रय खैरे, धनाजी सस्ते, सौदागर गव्हाणे, नेताजी उबाळे, सतीश गुंड, कैलास सस्ते, शंकर जाधव, सौदागर खरात, भिवाजी जाधव, समाधान कोकाटे, सज्जन मुळे, सागर मोरे, दयानंद शेंडगे, दिनेश कदम, अजित बरबडे, अशोक कदम, बाळू खांडेकर, तानाजी खरात, रोहन कदम, गणेश सस्ते यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार गोरख शेगर यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Advertise