खा. विजयसिंह मोहिते पाटील गटाची विजयी सलामी; माळशिरस गट क्र. १ मधून तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 27, 2018

खा. विजयसिंह मोहिते पाटील गटाची विजयी सलामी; माळशिरस गट क्र. १ मधून तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी


खा. विजयसिंह मोहिते पाटील गटाची विजयी सलामी
माळशिरस गट क्र. १ मधून तीनही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे:  श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असुन खा. विजयसिंह मोहीते पाटील गट आघाडीवर आहे. मात्र अद्याप प्रत्येक टेबलवर मतपत्रिका असल्याने मतमोजणीसाठी उशिर लागत आहे. वेगवेगळे गठ्ठे आहेत. सोसायटी मतदार संघाचा निकाल राखुन ठेवण्यात आला आहे. मतदार संघ क्र१ गट क्र १माळशिरस मतदार संघ यातून खा. विजयसिंह मोहिते पाटील गटाचे तीनही उमेदवार निवडणून आले असून विरोधी गटाचे प्रमुख भानुदास सालगुडे-पाटील यांना मात्र धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला असल्याने विरोधी पद्मजादेवी मोहिते-पाटील गट काही अंशी बॅकफुट गेला आहे. 
सदर गटातील निवडणूक ही चुरशीची होणार असा अंदाज असताना मात्र मोठ्या फरकाने खा. विजयसिंह मोहिते पाटील गटाने बाजी मारली आहे. यामध्ये मिलींद कुलकर्णी ४१९३ मते,  धोंडीराम नाळे ४०६५ मते,  पोपट निंबाळकर १०४६ मते घेवून विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाच्या  सुरेश पाटील ३९०१ मते, संभाजी बोकफोडे १००४ मते व  भानुदास सालगुडे-पाटील यांना १०६४ मते मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
अधिक माहितीसाठी आमच्या www.mandeshexpress.com या वेबसाईट ला भेट द्या.


No comments:

Post a Comment

Advertise