सांगलीत ११ रोजी दुसरे विचारमंथन संमेलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

सांगलीत ११ रोजी दुसरे विचारमंथन संमेलन


सांगलीत ११ रोजी दुसरे विचारमंथन संमेलन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली/प्रतिनिधी: प्रा.डॉ.पी.बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने शांतीनिकेतन,सांगली येथे दुसरे विचारमंथन संमेलन रवि. ११ नोव्हे. रोजी होणार आहे. साम्यवादी मार्क्स, सत्याग्रहीवादी गांधी व समतावादी आंबेडकर यांचे विचार मानवतेच्या कल्याणासाठी एकत्रित करणे गरजेचे आहे. या महापुरूषांच्या विचारधारेची आज खूप गरज देशाला निर्माण झाल़्याने हे संमेलन घेण्यात येत आहे. या संमेलनाचा प्रारंभ महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या बीजभाषणाने होणार आहे. तर विचारवंत डॉ. रजिया पटेल या प्रमुख अतिथी आहेत. विद्रोही विचारवंत, साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पी हे दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करतील, तर जेष्ट पत्रकार उत्तम कांबळे यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होईल. यावेळी राज्यभरातील राजकीय नेते, डावे, पूरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारवंत, साहित्यिक, समाजसेवी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. संमेलनस्थळी पुस्तक व विविध वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष गौतम पाटील यांनी सांगितले. तरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise