निंबवडे प्रीमियर लीग च्या दुसऱ्या पर्वास सुरवात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

निंबवडे प्रीमियर लीग च्या दुसऱ्या पर्वास सुरवात निंबवडे  प्रीमियर लीग च्या दुसऱ्या पर्वास सुरवात 

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
निंबवडे/वार्ताहर :  साहेबराव मुढे युवामंच निंबवडे आयोजित निंबवडे प्रीमियर मध्ये निंबवडे,  अनुसेवाडी, वाक्षेवाडी, मुढेवाडी, कामथ, कोकरेखोरा, यशवंतनगर, बेरगळवाडी या परिसरातील 12 संघ दोन गटात खेळणार आहेत. 
या लीगचे उदघाटन भाजपचे सोशल मिडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष जयवंत सरगर, चेअरमन एम.डी. पाटील, नामदेवशेट मोटे, जयंत देठे, सचिन मोटे ग्रा पं सदस्य, उल्हास मुढे, फायर बिग्रेड अधिकारी धुळापाटील, अमरसिह मूढे, पोलीस पाटील प्रवीण मंडले, इत्यादींच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
टीम अ मधून जय अहिल्या युवमंच अनुसेवाडी, धनुष इलेवन यशवंतनगर, भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी, चॅलेंजर ग्रुप निंबवडे अ, अहिल्या वॉरिअर्स कामथ, ऋषी इलेवन बेरगळवाडी,  तर टीम ब मधून हॉटेल सुशांत इलेवन अनुसेवाडी, चॅलेंजर ग्रुप निंबवडे ब, शिवनेरी ज्वेलर्स यशवंतनगर, पिवळं वादळ कामथ, साहिल ज्वेलर्स कोकरेखोरा, मल्हार टायगर मुढेवाडी हे संघ भिडणार आहेत.


आटपाडी प्रीमियर लीग, विटा प्रीमियर लीग, BDS चषक, दिघंची लीग, कलंबोली लीग या लीग मध्ये निंबवडे परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून यां परिसरातील जास्तीत-जास्त खेळाडू सहभागी व्हावे म्हणून निंबवडे प्रीमियर लीगची सुरवात केली आहे. साहेबराव मुढे आयोजक निंबवडे प्रीमियर लीग 

No comments:

Post a Comment

Advertise