Type Here to Get Search Results !

फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी वि. ना. काळम


फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी वि. ना. काळम
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन सिव्हील नंबर 728/2015 अन्वये दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी संबंधित सर्व यंत्रणांनी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असून यामध्ये विद्यार्थ्यांनी फटाके विकत घेवू नयेत व ते वापरू नयेत याबाबत शिक्षकांनी जास्तीत जास्त प्रबोधन करावे. तसेच तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी यांनी फटाक्याच्या दुष्परिणामाबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून फटाक्यांचा वापर न करण्याबाबत किंवा कमी करण्याबाबत जनजागृती करावी. 
दिवाळी किंवा इतर सणांवेळी जसे की, गुरपरब अशा वेळी फटाक्यांचा वापर स्ट्रीक्टली रात्री 8 ते  रात्री 10 च्या दरम्यानच करावा. ख्रिसमस व नवीन वर्ष यावेळी फटाक्यांचा वापर रात्री 11.55 ते रात्री 12.30 या दरम्यानच व्हावा. असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. संबंधित पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी फटाके या दिलेल्या वेळेतच वाजविले जातील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच प्रतिबंधित फटाक्यांची विक्री होणार नाही याचीही खात्री करावी. कोणत्याही प्रकारे आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पोलीस स्टेशनच्या एसएचओ किंवा पोलीस स्थानक प्रमुखास वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येवून न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन हा न्यायालयाचा अवमान समजण्यात येईल.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिवाळीपूर्वी सात दिवस व दिवाळी नंतर सात दिवस असे एकूण 14 दिवस फटाक्यांच्या दुष्परिणामाच्या अनुषंगाने हवेची गुणवत्ता तपासावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies