दुष्काळ केला पण उपाययोजना कधी होणार? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

दुष्काळ केला पण उपाययोजना कधी होणार?

दुष्काळ केला पण उपाययोजना कधी होणार?
राष्ट्रवादीचा सरकारवर ताशेरे ओढत दिले विविध मागण्यांचे निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : भाजप सरकार करायच काय, खाली मुंडी वर पाय! अशी घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळशिरस येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खास. विजयसिंह मोहीते-पाटील यांनी आयोजीत केलेल्या टंचाई आढावा बैठकीतील समस्यांवर तातडीणे उपाययोजना करावी. तालुका दुष्काळी जाहीर झाला असला तरी योजनांचा लाभ कधी मिळणार? या बाबत सरकार जनतेची फसवणुक करीत असल्याचा आरोप करीत आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्र्य भिलारे, तालुका अध्यक्ष संग्रामसिंह जहागिरदार, संभापती वैष्ववीदेवी मोहीते- पाटील, उपसभापती किशोर सुळ-पाटील, जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते पाटील, सुनंदा फुले, ऋतुजा मोरे, गणेश पाटील, बाळासाहेब धांईजे, अरुण तोडकर, पं स. सदस्य अर्जुनसिंह मोहिते- पाटील, प्रतापराव पाटील, रेणुका माने - देशमुख, हसीना शेख, प्रकाशराव पाटील,  रामचंद्र सावंत पाटील, बाबुराव पताळे- पाटील, रावसाहेब पराडे पाटील, लक्ष्मण शिंदे, नामदेव ठवरे, भिमराव काळे, मोहन लोंढे, सरपंच शिवतेजसिंह मोहिते -पाटील, श्रीराज माने पाटील, धनाजी दुपडे, दत्तात्र्य ननवरे, लक्ष्मण पवार, गणपतराव वाघमोडे,सुतगिरणीचे व्हा.चेअरमन राजेद्र शिंदे, सेवा संघाचे उत्तमराव माने-शेंडगे, आनंदराव माने-देशमुख, अमरसिंह माने -देशमुख, हनुमंत वाघमोडे, माजी उपसरपंच मळोली चंद्रकांत जाधव, अलताप अतार, विराजराजे निबांळकर, दादासो शिंगाडे, भोजराज माने, बाजीराव सरगर, अरविंद जाधव यांच्यासह मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.


दुष्काळी परिस्थितीबाबत अधिकारी निष्क्रीयता दाखवत नाहीत, शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय, आम्ही खोट बोलतो हे कबुलही केल जातय. मुख्यमंत्री म्हणजे मैदयाच पोत असा समाचार घेत भाजपा सरकारवर संग्रामसिंह जहागीरदार यांनी  टिका केली. यावेळी मदनसिंह मोहीते पाटील सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून यात तालुक्यात रब्बी हंगामासाठी पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात यावा. उन्हाळ्यात पाण्याची दोन आवर्तने मिळावीत. फळबागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून प्रतिहेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळावे. तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाचे तलाव निरा उजवा काळाच्या कालव्याच्या पाण्याने भरुन मिळावेत. निरा देवघर योजनेत १६ गावांचा समावेश केला जावा. राजेवाडी तलावातील पाणी बचेरी, कोळेगाव सह अन्य गावांना पाणी देऊन दुष्काळावर मात करावी. तालुक्यातील नीरा नदीवरील कोरडे असलेले बंधारे नवीन दारे बसवुन पाणी सोडुन पाण्याने भरून द्यावेत. तालुक्यातील ओढ्यांना कालव्याचे पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची सोय करूण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा. तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत इतर इतर गावांना योजनेमध्ये समावून घेतले जावे.
चाऱ्याची टंचाई असल्याने चारा छावण्या सुरू कराव्यात. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी व रोगांपासून जनावरे वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत. तालुक्यातील टंचाईवर आराखडा तयार करून त्यास मंजुरी मिळावी. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदानाचा लाभ देण्यात यावा. शेतकऱ्यांची वीजबिले माफ करुन १८ तास वीज शेती पंपाला मिळावी. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळी, विहिरी, पाझर तलाव आदी कामे तात्काळ हाती घेतली जावीत. अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी त्वरित टँकर चालू करावेत. शालेय विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी. तालुक्यात होत असलेले हुमणी व आळी मुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोप भरपाई मिळावी. पेट्रोल व डिझेल यांचे भाव कमी करण्यात यावेत. तालुक्यातील रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून रिक्त पदावर ताबडतोप भरणा करण्यात यावा.  अशा प्रकारचा प्रमुख १९ मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise