सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
माणदेश एकस्प्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी करण्यात आली. तसेच जयंतीनिमित्त व व दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पोशाखात येऊन गीते सादर केली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपआपले विचार मांडले.  प्राचार्य योगेश गुजरे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यामध्ये राजगिरा लाडू, चिवडा, फरसाना, व जिलेबी वाटप करण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिवाळी सुट्टीत काही दिवाळी अंकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांकडून कार्यानुभव अंतर्गत दिवाळी वस्तू बनवून घेण्यात आल्या.यामध्ये आकाश कंदील,भेट कार्ड, मातीचे दिवे इ. साहित्य विद्यार्थी यांनी बनवले.
यावेळी संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise