मनीषा कुमार पाटील यांचा रत्नत्रय मध्ये सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

मनीषा कुमार पाटील यांचा रत्नत्रय मध्ये सत्कार

मनीषा कुमार पाटील यांचा रत्नत्रय मध्ये सत्कार
माणदेश एक्सप्रेस न्यूज
माळशिरस/संजय हुलगे : मांडवे ता .माळशिरस येथील मनीषा कुमार पाटील यांचा सत्कार रत्नत्रय इंग्लिश मेडियम व कनिष्ठ महाविद्यालय मांडवेच्या संचालिका मृणालिनी अनंतलाल दोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच पाटील म्हणाल्या. शाळेची कमी कालावधीत खूप प्रगती झाली आहे. शाळेला या पुढे मदत करण्याचे आश्वासन दिले.
संस्थापक अनंतलाल दोशी म्हणाले, पाटील कुटुंब व दोशी कुटुंबाचे घनिष्ठ संबंध व ऋणानुबंध आहेत. व ते या पुढेंही राहतील.  चेअरमन प्रमोद दोशी म्हणाले, कुमार पाटील यांनी वेळोवेळी आम्हांला सहकार्य मिळाले आहे. त्यांचा हाच स्वभाव असल्याने बिनविरोध निवड झाली. मनीषा कुमार पाटील यांच्या हस्ते संचालिका मृणालिनी अनंतलाल दोशी यांचा वाढदिवसच्या निमित्ताने प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थापक अनंतलाल दोशी, चेअरमन प्रमोद दोशी, रत्नत्रय पतसंस्थाचे सचिव ज्ञानेश राऊत, सतीश बनकर, सतीश बनकर, दत्ता भोसले, विक्रम रणवरे, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे, पर्यवेक्षक सतिश हांगे सर्व शिक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise