सांगली जिल्हा अंनिस ची संघटना बांधणी; दि.17 व 18 रोजी इस्लामपूरला के.बी.पी. कॉलेज येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; कार्याध्यक्ष अजय भालकर यांची माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

सांगली जिल्हा अंनिस ची संघटना बांधणी; दि.17 व 18 रोजी इस्लामपूरला के.बी.पी. कॉलेज येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; कार्याध्यक्ष अजय भालकर यांची माहिती


सांगली जिल्हा अंनिस ची संघटना बांधणी 
दि.17 व 18 रोजी इस्लामपूरला के.बी.पी. कॉलेज येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; कार्याध्यक्ष अजय भालकर यांची माहिती
माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर: कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर ता. वाळवा, जि.संल्गी येथे  दिनांक 17 व 18 नोव्हेंबर २०१८ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटना बांधणीसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अजय भालकर यांनी दिली. सदरचे प्रशिक्षण शिबिर हे सांगली जिल्ह्यासाठी आयोजन केले आहे त्यामुळे शनिवार सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या बैठकीला हजर राहणार आहेत.
या बैठकीमध्ये अमरावती येथे झालेल्या राज्य कार्यकारणी चा अहवाल मांडणे व त्यावर चर्चा करणे. डिसेंबर महिन्यात सभासद नोंदणी महाअभियान राबविणे व नवीन शाखा कार्यकारणी निवडणे. वार्तापत्र सभासद निवडणे व चर्चा करणे. ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे इ. विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. 
तरी या प्रशिक्षण शिबिरात जिल्ह्यातील सर्व आजी माजी सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक व नवीन समितीत काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवती यांनी सहभागी होण्याचे आवाहनही जिल्हा कार्याध्यक्ष अजय भालकर व प्रधान सचिव सुनिल भिंगे यांनी केले आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींची राहण्याची व भोजनाची मोफत सोय केली आहे. तरी इच्छुक सभासदांनी अधिक माहितीसाठी ९७३०३०१२१८ व ९३५९०८०८२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise