डॉ. नष्टे नष्टे यांनी दिला अनाथांना मदतीचा हात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 19, 2018

डॉ. नष्टे नष्टे यांनी दिला अनाथांना मदतीचा हात


डॉ. नष्टे नष्टे यांनी दिला  अनाथांना मदतीचा हात 
माणदेश एक्सप्रेस न्युज 
श्रीपूर/वार्ताहर: वाढदिवस म्हटले डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करणे, चौकात मोठ्या आवाजात डीजेची गाणे लावून मंदधुद होऊन नाचणे, हॉटेलमध्ये पार्टीचे सेलिब्रेशन करणे ही आज काळाची जणू फॅशन झाली आहे. वाढदिवसला पुढारी बोलविणे, पैशाची वारेमाप व्यर्थ उधळण करण्यात आजची तरूणाई मश्गुल झाली आहे. पण याचं विचारांना छेद देत वैचारिकतेचे मुळ असलेले आणि समाजसेवेचे   ज्ञान आणि भान असलेले डॉ. प्रफुल्ल बबन नष्टे यांनी आपल्या आनंदोउत्साहात सक्रिय न होता पंढरपूर येथील अनाथ वृद्धांना व लहान मुलांना कपडे आणि खाऊ वाटप करून वाढदिवस  साजरा केला. सध्या थंडीचे दिवस असल्याने आज ही समाजातील काही घटक ज्यांना कोणीच नाही अशा अनाथाचा नाथ होऊन त्यांनी आपल्या  वाढदिवस अनाथ लोकांना व महीलाना, मुलांना थंडी पासून संरक्षण होण्यासाठी बॅलकेंट, चादर व लहान मुलांना कपडे ,खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महावीर (दादा) शेंडगे मित्र परिवार श्रीपूर यांनी पंढरपूर येथील अनाथ, लोकांना महिला व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात परिक्षम घेतले. यावेळी महावीर दादा शेंडगे. मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहुन हा कार्यक्रम यशस्वी केला. डॉ. प्रफुल्ल नष्टे  यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise