जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शनिवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 16, 2018

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शनिवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम


जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शनिवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम
माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली, दि. 15 : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शनिवार, दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजी कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनीती आणि आव्हान या विषयावर विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूरचे उपसंचालक (माहिती) सतीश लळित मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले आहे. 
यावेळी युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त फेसाटीकार नवनाथ गोरे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. 17 नोव्हेंबर 2018 रोजी आत्मा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सांगली मिरज रोड, सांगली येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. 

दिपक केसरकर आज सांगली जिल्हा दौऱ्यावर
सांगली, दि. 15: गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 16 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या भव्य स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - महात्मा गांधी वसतीगृह आवार, सांगली-मिरज रस्ता, हॉटेल सदानंद जवळ, सांगली. दुपारी 12.30 वाजता सांगलीहून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment

Advertise