शासनाने कोळी समाजाला न्याय द्यावा : धैर्यशिल देशमुख - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 26, 2018

शासनाने कोळी समाजाला न्याय द्यावा : धैर्यशिल देशमुख


शासनाने कोळी समाजाला न्याय द्यावा : धैर्यशिल देशमुख
माणदेश न्यूज नेटवर्क 
नातेपुते/प्रमोद शिंदे : सोलापुर जिल्हयातील कोळी समाज हा आदिवासीच आहे. त्यामुळे घटनेप्रमाणे त्याना अनुसुचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात. त्या न मिळाल्यामुळे समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची बनत चालली आहे. अनादि काळापासुन हा समाज येथे राहत आला आहे. त्यांच्या रिती-रिवाज, परंपरा ह्या आदिवासीच्या आहेत. त्यामुळे विना अट जिल्ह्यातील कोळी समाजाला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देऊन न्याय द्यावा असे मत व्यसनमुक्त संघटनेचे राज्याध्यक्ष धैर्यशिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 
ते नातेपुते येथे कोळी महासंघ आयोजित आद्यकवि महर्षि वाल्मीकी जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महर्षि वाल्मीकीच्या प्रतिमा पुजन, दीपप्रज्वलनाने व भक्ती, परंपरेच्या स्वागत गिताने झाली. 

यावेळी सरपंच अॅड. बी.वाय. राऊत, सपोनि राजकुमार भुजबळ, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संभाजीराव फुले, पुरुषोत्तम भरते, कोळी महासंघाचे जिल्हा संघटक बाळासाहेब बळवंतराव, अंकुश कोळी, मुकुंद परचंडे, नितीन कोळी, समाधान कोळी, ज्ञानेश्वर सर्जे, अनंतराव कोळी, नागेश कोळी, निलाप्पा बनजगोळकर, प्रकाश बाळगे, राम पंतगे, रोहित देशमुख, शंकर कोळी, हर्षद परचंडे, अथर्व बळवंतराव, अन्नपूर्णा कोळी, भक्ती परचंडे, मनिषा  कोळी, वंदना बळवंतराव, यशवंती कोळी, राणी कोळी, सत्वशिला परचंडे, सारीका कोळी, यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मुकंद परचंडे यांनी सूत्रसंचालन केले तर अंकुश कोळी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Advertise