आदर्शचा पै.खाशाबा मदने विभागीय स्पर्धेत प्रथम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 27, 2018

आदर्शचा पै.खाशाबा मदने विभागीय स्पर्धेत प्रथम


आदर्शचा पै.खाशाबा मदने विभागीय स्पर्धेत प्रथम
माणदेश न्यूज नेटवर्क 
विटा/प्रतिनिधी :  लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट संचलित आदर्श कॉलेज विटा मधील पैलवान खाशाबा मदने याने शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विभागीय कुस्ती स्पर्धेत स्पर्धेत ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. 
मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय, बोरगाव येथे पार पडलेल्या सांगली झोनल कुस्ती स्पर्धेत ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून त्याची विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अॅड. सदशिवाराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष अॅड. वैभव (दादा) पाटील, विश्वस्त विशाल (काका) पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, प्रभारी प्राचार्य डी.डी. शिंदे यांनी अभिनंदन केले. पै.मदने यास क्रिडा शिक्षक सुर्यकांत शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Advertise