टी. पी. देशमुख सर; शिक्षणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 24, 2018

टी. पी. देशमुख सर; शिक्षणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व


टी. पी. देशमुख सर; 
शिक्षणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व
गावातून बाहेर पडल्यानंतर गावी जाण दुर्मिळच झालय. मात्र गावची ओढ कायम राहिली आहे. आज दि. 23 ऑक्टोबर 2018 रोजी गावकडील भागातच होतो. पहाटे सव्वासहाच्या सुमारास परत साताराला जात असताना पाठीमागे वळून गावाला पाहण्याचा प्रयत्न केला मनातल्या मनात हात जोडले. एसटी निघाली. यावेळी सात वाजण्याच्या व्हॉट्‌सअप पाहिले व टी.पी. देशमुख सर यांचे निधन झाल्याचे समजले. मन अतिशय खिन्न झाले. क्षणभर डोळे मिटले व टी.पी. सरांची छबी डोळ्यासमोर आली. पुन्हा पाठीमागे वळून पाहिले व सरांना दंडवत केला. टी.पी.देशमुख सरांचे कार्य म्हणजे गावातील शिक्षणासाठी प्राथमिक सुविधा उभारण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे. गावातील शिक्षण क्षेत्रातील ते ऋषीतुल्य व्यक्तिमत्वच होय.
साधारण 40 वर्षापूर्वी गावाच्या मधोमध किंचित थोडेसे बाजूला असणारा टी.पी. देशमुख सर यांचा वाडा व तेथे विद्यालय, कॉलेज भरत असल्याचे चांगलच आठवतय. या वाड्यात जायला दोन रस्ते. गावच्या पेठेतून गेल्यास या वाड्याच्या सुरुवातीला आयताकृती मैदान होते. या मैदानातून वाड्यात, महाविद्यालय-कॉलेजमध्ये जायचे झाल्यास 10 ते 12 पायर्याक चढून जावे लागे. वर गेल्यानंतर डाव्या व उजव्या बाजूला वर्ग समोरासमोर एक मोठा हॉल. कदाचित त्यावेळी ते कार्यालय असाव. याला लागूनच उजव्या बाजूला त्यावेळी सर राहत असलेले घर. असा टी.पी. सरांचा वाडा. कार्यालयाला लागूनच सरळ पुढे गेल्यानंतर तेथून पुढे बाहेर पडण्यासाठी रस्ता व पुढे लोक वसाहत. टी.पी. सरांच्या या वाड्यातील मैदानात लहानपणी गोट्या, क्रिकेट, लंपडाव खूप खेळलो. इथे कॉलेज, विद्यालय किती वर्ष भरले माहित नाही. याशिवाय लहानपणी रामायण, महाभारत आम्ही त्यांच्याच घरी पहायला जायचो. यामुळे या वाड्याशी आमचा विशेष स्नेह राहिला.
आमच्या दुर्देवाने टी.पी. सरांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले नाही पण त्यांना जवळून पाहिल्याचे चांगलच आठवतय. शिक्षणासाठी उभे आयुष्य त्यांनी वेचले. संस्कृत हा त्यांचा विषय. दुर्दैवाने सर निवृत्त झाले व पुढे हा विषयही हायस्कूल, कॉलेजमधून हद्दपार झाला. माझी बॅचला आठवी ते बारावी या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरुवातीला ते आम्हाला मुख्याध्यापक म्हणून होते. त्यानंतर ते निवृत्त झाले. टी.पी. सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य असामान्य राहिले आहे. आज ते सर्वांमध्ये नाहीत मात्र त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेली सेवा सदैव लक्षात राहिल. आदरणीय टी.पी. देशमुख सरांना अभिवादन.
                    
                                                                                                                   शब्दांकन
                                                                                                                 व्ही. एन. हेंद्रे
                                                                                                                   सातारा.

No comments:

Post a Comment

Advertise