सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 23, 2018

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची संभाजी ब्रिगेड ची मागणी


सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा - संभाजी ब्रिगेड 
माणदेश न्युज नेटवर्क 
पेहे/वार्ताहर : सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या प्रमुख मागणी सह विविध मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय कार्यालय येथे देण्यात आले. कार्यालयाच्या वतीने लिपिक एस.एस. वजाळे यांनी निवेदन स्वीकारले. 
हुमणी ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करून त्याला अनुदान द्यावे, चारा छावणी उभा करून पशुधन वाचवावे, कर्जमाफी यादी दुरुस्त करून सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांची वीज बिले-शेतसारा सरसकट माफ करावा,सर्व विद्यार्थ्यांना २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना सरसकट फी माफी करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात  आल्या असून निवेदनाची प्रत पालकमंत्री. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष गोटूदादा मोरे, जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा आशा टोणपे, ता. सचिव सचिन खुळे, ता.कार्याध्यक्ष सतीश चांदगुडे, ता.संघटक भारत पाटील, म्हैसगावचे नेते लक्ष्मण पाटील, मोडनींब शहराध्यक्ष भैय्यासो माने, टेंभुर्णी शहराध्यक्ष नितीन मुळे, उपाध्यक्ष नागनाथ चांदगुडे, विभागप्रमुख बालाजी जगताप, कुर्डूवाडी शहराध्यक्ष धनराज पवार, कुर्डू गटप्रमुख रोहित पाटील, अकोले खु!! गटप्रमुख दादासो तळेकर, राजाराम जगताप, सुनील नरोटे, मधूसुदन मोरे, वीर भगतसिंग, विद्यार्थी परिषद तालुकाध्यक्ष ऋषिकेश मुंगसे, विनायक गायकवाड, शुभम गोडगे, स्वप्निल बोराडे, पालवणचे युवा नेते सागर रंदवे, कुर्डू शाखाध्यक्ष नितीन वरकड, संभाजी ब्रिगेडचे टेंभुर्णी नेते सचिन जाधव, सोनाजी पाटील, चिंचगाव शाखाप्रमुख संदेश कराळे, आदींसह संभाजी ब्रिगेडचे सदस्य उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Advertise