Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व रस्ता दुभाजक कामाचे भूमिपूजन संपन्न



छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण
व रस्ता दुभाजक कामाचे भूमिपूजन संपन्न
माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा/मनोज कांबळे: विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या छत्रपती  शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व चौकातील आयलँड व रस्ता दुभाजक कामाचा भूमिपूजन समारंभ माजी आमदार अॅड. सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते व जेष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्ये, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभवदादा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र शासनच्या वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत ३८ लक्ष रुपयांचा निधी खर्च करून श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व चौकातील आयलॅड व रस्ता दुभाजक बसविले जाणार आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन काल दि. १० आक्टोंबर २०१८ रोजी सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाले. 
यावेळी बोलताना बैभव पाटील म्हणाले कि सन १९८३ मध्ये विट्याच्या मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले होते. हा पुतळा विटा शहराची ओळख बनला आहे. या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्ठीने लोकांच्या मागणी नुसार सुमारे २१ लक्ष रुपये खर्च करून सुशोभीकरण केले जाणार आहे. पुतळ्यास पूर्वीचा ब्रांझ कलर  होता तोच आपण पुन्हा पुतळ्यास देतोय. दगडी बुरुजांची तटबंदी उभारली जाणार आहे. चौकामध्ये २० लक्ष खर्च करून आयलॅड उभा करून मुख्य चारही रस्त्याला दुभाजक बसविले जाणार आहेत. 
यावेळी जेष्ठ नेते गंगाधर लकडे, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, अॅड. सचिन जाधव, बी.आर. पाटील, माजी नगरसेवक विलास म्हेत्रे, सचिन शितोळे, आलमगीर मुल्ला, झाकीर तांबोळी, विश्वनाथ कांबळे, भरत कांबळे, विश्वास कांबळे, नगरसेवक फिरोज तांबोळी, रविंद्र कदम, संजय तारळेकर, अरुण गायकवाड, अॅड. विजय जाधव, प्रताप सुतार, किशोर डोंबे, अॅड. धर्मेश पाटील, विनोद पाटील, निलेश दिवटे, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, भाग्यनगरचे माजी सरपंच राजकुमार जगताप, बाळासाहेब मेटकरी, विजय चव्हाण, अधिक कदम, सागर लकडे, हिंदवी प्रतिष्ठान चे महेश बाबर, निरंजन मुंढे, विश्वास कोरुलकर, राजेश चव्हाण, शरद कोळी, जयन्द्र यादव, सोमनाथ गांजवे, शिवाजी हजारे, राहुल कुंभार, स्वप्नील गुरव, चेतन पाटील विश्वजित शिंदे संतोष बिडकर, प्रकाश मोकाशी, सुरज सावंत, विटा नगरपालिकेचे अधिक्षक सुर्यकांत निकम, गजानन कदम, सुनील जमदाडे, सुभाष कवडे, कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम, याबरोबरच विटा शहरातील युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies