खुडूस ग्रामपंचायतीस १२ लाख ४७ हजार रूपयांचा निधी मंजुर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

खुडूस ग्रामपंचायतीस १२ लाख ४७ हजार रूपयांचा निधी मंजुर


खुडूस ग्रामपंचायतीस 
१२ लाख ४७ हजार रूपयांचा 
निधी मंजुर
माणदेश न्यूज नेटवर्क
माळशिरस/संजय हुलगे : खुडूस ता. माळशिरस ग्रामपंचायतीस जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पूरविणे या योजने अंतर्गत खुडूस ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये ६२ फाटा ते आंबेमळा रस्ता खडीकरण करणे ३ लाख १२ हजार, तसेच ठोंबरे वस्ती, बोरकर वस्ती, शिपाई वस्ती, निकम वस्ती, एकतानगर या ठिकाणी विद्युतीकरण करणे हायमस्ट दिवे उभा करणे या कामासाठी ९ लाख ३५ हजार असे एकुण १२ लाख ४७ हजार रूपये निधी मंजूर झाल्याची माहीती सरपंच सौ. वंदना सरगर व उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. रंजना ठवरे, वनिता माने, वसंतराव निकम, रामचंद्र दोलतडे, शारदा भोपळे, महादेव साठे, सविता गोरवे, रेखा कांबळे, सुरेखा बनकर आदी उपस्थित होते.
 सदर निधी मंजुरीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, नेते उत्तमराव जानकर, माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, माजी सरपंच अॅड. शहाजीकाका ठवरे, पं.स. सदस्य अजय सकट यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले असुन लवकरच कामाचे अंदाजपत्रक तयार करुन, निवीदा करुन काम पूर्ण करण्यात येईल अशी माहीती दिली. 

No comments:

Post a Comment

Advertise