जिल्हा परिषद शाळेत सापांचा वावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 11, 2018

जिल्हा परिषद शाळेत सापांचा वावर


जिल्हा परिषद शाळेत सापांचा वावर
सरपंच अमोल मोरे यांनी केली पाहणी, शाळा दुरुस्तीची ग्वाही
दिघंची/वार्ताहर:  दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली  येथील जिल्हा परिषदेच्या शाळा नं 1 च्या आवारात सापांचा वावर आढळला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक व पालकांनी तात्काळ सरपंच अमोल मोरे यांना परिस्थिती सांगितली व शाळा दुरुस्तीची मागणी केली. सरपंच अमोल मोरे यांनी तात्काळ शाळा दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली.
दिघंची येथील दिघंची जिल्हा परिषद शाळा नं 1 ची इमारत जुनी दगडी बांधकामाची आहे. काही वर्षांपूर्वी  शाळा दुरुस्ती म्हणून जुनी कौले काढून नवीन पत्रा टाकण्यात आला. परंतु शाळेच्या मागील बाजूस  घाणीचे साम्राज्य आहे व भिंतीला  देखील तडे गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सापांचा वावर वाढला आहे. येथील लोकांच्या माहिती नुसार  गेली दोन ते तीन महिन्यापासून या ठिकाणी सापांचा वावर आहे. दोन ते तीन वेळा सर्पमित्र महादेव कदम यांनी देखील सापांना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.
 याबाबत माहिती समजताच  सरपंच अमोल मोरे यांनी तात्काळ शाळेला भेट दिली व शाळेची पाहणी केली व शाळा दुरुस्ती करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मार्फत तात्काळ उपाययोजना करू आहि ग्वाही दिली तर फक्त शाळांची दुरुस्ती न करता भविष्यात शाळा स्वचतेबाबत देखील अव्वल ठेवू अशी ग्वाही दिली.


No comments:

Post a Comment

Advertise