आढीव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश चव्हाण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 24, 2018

आढीव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश चव्हाण


आढीव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुरेश चव्हाण 
 माणदेश न्यूज नेटवर्क/आढीव प्रतिनिधी : आढीव ता, पंढरपुर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी सुरेश हरिभाऊ चव्हाण यांची निवड करण्यात आली. या वेळी सर्व पालक उपस्थित होते. या वेळी चर्चा करून ( 11 ) सदस्यांची निवड करण्यात आली. या पालक सभेच्या निवडीचे काम सहकार शिरेमणी चे संचालक दिनकर दाजी चव्हाण, सरपंच दत्तात्रय चव्हाण ,मोहन चव्हाण ,माजी सरपंच एकनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शना खाली या बैठकीत पार पडली.  तरूण व होतकरू, संयमी अभ्यासु व्याक्तिमत्व तसेच गावातील युवकांना मार्गदर्शन करणारे सुरेश चव्हाण यांची अध्यक्षपदी तर वासुदेव पाटील यांची उपध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. सदस्य पदी म्हणुन अश्विन कुडाळ, सविता खाडे, प्रविण कांबळे, महेश चव्हाण, हरिभाऊ वसेकर, विष्णु राजगुरू, मनोहर कांबळे, पुरूषेत्तम चव्हाण यांची निवड करण्यात आली. 
शिक्षणप्रेमी चंद्रकांत शिवाजी माहाडिक तर शिक्षक मुख्याध्यापक सचिव शिरगुर सर यांनी शासनाच्या  निकषानुसार निवड केली. या वेळी ह,भ,प, शंकर महाराज चव्हाण, अध्यक्ष भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आढीव तंटामक्ती अध्यक्ष अंकुश चव्हाण यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Advertise