आटपाडी बाजार समितीची २६ रोजी वार्षिक सभेस उपस्थित रहा: शशिकांत जाधव - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 24, 2018

आटपाडी बाजार समितीची २६ रोजी वार्षिक सभेस उपस्थित रहा: शशिकांत जाधव


आटपाडी बाजार समितीची २६ रोजी 
वार्षिक सभेस उपस्थित रहा: शशिकांत जाधव 
माणदेश न्यूज नेटवर्क/आटपाडी; कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी या संस्थेची सन 2017-2018 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 26 सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी १.३० वाजता आटपाडी मार्केट यार्डातील आधुनिक डाळिंब (पणन) संकुल आटपाडी येथे आयोजित केली आहे. सदर सर्वसाधारण सभेस तालुक्यातील विकास सोसायटीचे प्रतिनिधी,ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी,व्यापारी प्रतिनिधी,हमाल,माथाडी प्रतिनिधी तसेच तालुक्यातील मान्यवर व शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी केले आहे.
या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये सन 2017-18 सालाचे तेरीज,उत्पन्न-खर्च, ताळेबंद पत्रकानुसार चर्चा करण्यात येणार आहे. सन 2016-17 सालाचे मे.विशेष लेखापरीक्षक (पणन) सहकारी संस्था, सांगली यांनी केलेल्या लेखापरीक्षणावर चर्चा करणे, तसेच सन २०१७-१८ सालाचे वार्षिक प्रशासकीय अहवालावर चर्चा करणे व ऐनवेळी अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या सभेस गणपूर्तीची कोणतीही अट असणार नाही. सभा ठरलेल्या तारखेस व ठरलेल्या वेळी त्याच ठिकाणी होणार असल्याची माहिती सचिव शशिकांत जाधव यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise